Now directly WhatsApp number of Police Commissioner | पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी आता थेट पोलीस आयुक्तांचा व्हाट्सअप नंबर....!!! - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Tuesday, 11 July 2023

Now directly WhatsApp number of Police Commissioner | पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी आता थेट पोलीस आयुक्तांचा व्हाट्सअप नंबर....!!!

पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी आता थेट पोलीस आयुक्तांचा व्हाट्सअप नंबर....!!!

 

 

पुणे माझा न्युज नेटवर्क । प्रतिनिधी : पुणे पोलीस आयुक्तांनी महिलांसह पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी  89759 53100 हा व्हाट्सअप नंबर जाहीर केला आहे. या नंबरच्या माध्यमातून महिलांना गरजाच्यावेळी व्हाट्सअप वरून थेट पोलिसांची मदत मिळणार आहे. त्यासाठी पुणे शहरातील नागरिकांनी या व्हाट्सअप नंबरची नोंद घ्यावी. तसेच तातडीच्या मदतीसाठी 112 नंबर वर देखील संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे. 

या सेवेच्या माध्यमातून महिला, विद्यार्थिनी तसेच कारले आणि कामकाज करणाऱ्या महिला यांना आपल्या समस्या व गरजेच्या वेळी मदतीसाठी या व्हाट्सअप नंबरवर मेसेज पाठवता येणार आहे. त्याची नोंद घेऊन योग्य ती पोलीस मदत त्यांना मिळेल. पुणे शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी पुणे पोलीस आयुक्तांनी हा आणखी एक विधायक उपक्रम यानिमित्ताने सुरू केला आहे. नमस्कार पुणेकरांनो.. आपल्या मोबाईलमध्ये पोलीस आयुक्त व्हॉट्स ॲप नंबर जतन करा.. 89759 53100 तुमच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना/अभिप्राय देण्यासाठी मेसेज करू शकता. त्यासोबतच इतर घटनांचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. तातडीच्या सेवेसाठी ११२ डायल करा. - रितेश कुमार, पोलिस आयुक्त.

No comments:

Post a Comment

Post Top Ad