What exactly is going on at the Kalepadal Police Station? काळेपडळ पोलीस ठाण्यात नेमकं काय सुरू आहे? — वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संशयास्पद हालचालींवर नियंत्रण कोणाचे? - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Saturday, 29 November 2025

What exactly is going on at the Kalepadal Police Station? काळेपडळ पोलीस ठाण्यात नेमकं काय सुरू आहे? — वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संशयास्पद हालचालींवर नियंत्रण कोणाचे?

काळेपडळ पोलीस ठाण्यात RTI चा खुलेआम अपमान!
PIO अमर काळंगे यांच्याकडून मुद्दाम टाळाटाळ, चुकीचे कलम ८(३) लावून माहिती दडपली

पुणे माझा न्यूज | विशेष बातमी, पुणे : नागरिकांचा मूलभूत हक्क असलेल्या माहिती अधिकाराचा ठाण्यातच जाहीर अपमान! काळेपडळ पोलीस ठाण्याचे जनमाहिती अधिकारी तथा गुन्हे निरीक्षक अमर काळंगे यांनी ९ व १३ नोव्हेंबर २०२५ रोजी दाखल RTI अर्जाला जाणीवपूर्वक उत्तर देण्यास टाळाटाळ करत कलम ८(३) (२० वर्षांहून जुन्या नोंदींसाठीच लागू) हे पूर्णतः चुकीचे कलम लावून माहिती नाकारली. यावरून स्पष्ट दिसून येते कि जनमाहिती अधिकारी यांचा अभ्यास कमी आहे कारण भ्रष्टाचार व होत असलेला गैर कारभार लपवण्यासाठी अभ्यास करून बसवले असल्याचे दिसते कारण ही माहिती अवघ्या काही महिन्यांची असतानाही कायद्याची मोडतोड करून पारदर्शकतेपासून पळ काढण्याचा हा थेट प्रयत्न जनमाहिती अधिकारी गुन्हे निरीक्षक अमर काळंगे यांनी केल्याचे दिसते.

यापूर्वीही दबाव आणि धमकी!
याच पोलीस ठाण्यातील अनधिकृत बांधकामावर प्रश्न उपस्थित करणारा RTI अर्ज दाखल झाला होता. तेव्हा अर्जदाराला धमकी देऊन, दबाव टाकून अर्ज मागे घ्यायला लावून त्याच्याकडून एक लेखी अर्ज लिहून घेतला आणि तोंडी आश्वासन देऊन गप्प केले. आजतागायत ती माहितीही दिली नाही. म्हणजेच पोलीस ठाणेच RTI चा गळा आवळत आहे!

 
अर्जदार आता प्रथम अपील दाखल करणार असून, अमर काळंगे यांच्यावर कलम २० अन्वये २५,००० रु. दंड, शिस्तभंग कारवाई आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असून शेवट पर्यंत याचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

सामाजिक कार्यकर्ते म्हणतात,  
“पोलीस ठाणेच जर कायद्याची पायमल्ली करत असेल, तर नागरिकांचा विश्वास कसा टिकणार? माहिती अधिकार हा भ्रष्टाचाराविरोधी हत्यार आहे; त्याला पोलीस ठाण्यातच मारले जात असेल तर हे अत्यंत गंभीर आहे.”
 

पुणे माझा न्यूजची मागणी :  
महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाने तत्काळ स्वयंस्फूर्तीने दखल घेऊन अमर काळंगे यांच्यावर कमाल दंड ठोठावावा, माहिती ७ दिवसांत देण्याचे आदेश द्यावेत आणि पोलीस आयुक्तांनी चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी.


पुणे माझा न्यूज सतत 
नागरिकांच्या हक्कांसाठी लढतो!

No comments:

Post a Comment

Post Top Ad