मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त कोंढवा येथे उम्मीद फाऊंडेशनतर्फे भव्य रॅलीचे आयोजन
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी कोंढवा (पुणे): मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त उम्मीद फाऊंडेशनच्या वतीने कोंढवा परिसरात भव्य व ऐतिहासिक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली कोणार्क पुरम मॉल येथून ज्योती चौक मार्गे कौसरबाग येथे जाऊन पुन्हा कोणार्क पुरम मॉल येथे समारोप करण्यात आली.
या रॅलीमध्ये परिसरातील तब्बल २५ शाळांनी सहभाग घेतला असून, विद्यार्थ्यांनी “शिक्षण हेच राष्ट्राचे सामर्थ्य” हा संदेश देत घोषणाबाजी केली. रॅलीनंतर मुलांना खाऊ व मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच डॉक्टर, शिक्षक आणि समाजसेवकांचा सत्कार करून त्यांना समाजसेवेबद्दल गौरविण्यात आले.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, मोहसीन भाई शेख, सलीम लाला, समाजसेवक छबिल भाई पटेल, अॅड. रशिदा सिद्दीकी यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन उम्मीद फाऊंडेशनचे अध्यक्ष काशिफ सैय्यद यांच्या पुढाकाराने करण्यात आले. त्यांनी रॅलीत सहभागी सर्व शाळा, शिक्षक, मान्यवर आणि सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
मौलाना अबुल कलाम आझाद – एक थोडक्यात परिचय
मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षणमंत्री, महान स्वातंत्र्यसैनिक, विद्वान आणि राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला आणि “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस” चे अध्यक्ष म्हणून देशाच्या ऐक्याचा संदेश दिला. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांच्या कार्यामुळेच भारतात विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थांची स्थापना झाली. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त ११ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) म्हणून साजरा केला जातो.
उम्मीद फाऊंडेशनचा संदेश
“शिक्षण, ऐक्य आणि समाजसेवा या तीन स्तंभांवर समाजाची प्रगती अवलंबून आहे. मौलाना आझाद यांच्या आदर्शांवर चालत आम्ही शिक्षण आणि सामाजिक ऐक्याचा प्रसार करत राहू.” – काशिफ सैय्यद, अध्यक्ष, उम्मीद फाऊंडेशन



No comments:
Post a Comment