पुणे माझा न्यूज प्रतिनिधि: आमची संस्था ही महात्मा गांधीजींच्या विचारधाराने म्हणजेच सत्य आणि अहिंसा वर चालणारी संस्था असून, आम्हास सध्या भारतामध्ये गंगा जमुना संस्कृती तसेच भारतीय एकात्मता याला बाधा आणणारे असामाजिक तत्वे तसेच ब्रम्हावाद, आर एस एस, बजरंग दल, हिंदु महासभा तसेच इतर संस्थे सोबत राजठाकरे प्रमाणे सत्तेचे लोभी राजकारणी भारतात हिंदू मुस्लिम ऐक्यात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न विविध कारणाने करीत आहेतच मंदिर मस्जिदचा वादालाही चालना देत आहेत.
पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर आणि सुसंस्कृत शहर परंतु येथेही मिलिंद एकबोटे सारखे काही व्यक्ती येथे अशांतता परसरविण्याचा प्रयत्न वर्षोन वर्ष करीत आहेत
परंतू काही दिवसापुर्वी नपूर शर्मा, जिंदाल, स्वामी सत्यानंद यांनी प्रत्यक्ष तसेच ट्यूटरद्वारे मुस्लिम समाजाचे आराध्य प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करून जगातील सर्वच मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या यावर अरब देशांनी पंतप्रधान मोदींना माफी मागण्यास सांगणे म्हणजे हे भारतदेश जो विश्वगुरू बनण्याच्या वाटेवर असताना अगदी छोट्या देशाने भारताला माफी मागण्यास लावणे हे तमाम भारतीयाचा मान सन्मान याचे हननच नाही का?
भारताची झालेली नामुष्की ही केवळ आणि केवळ भाजपाची प्रवक्ता नुपूर शर्मा व अन्य यांच्याच मुळे झाली असल्याने आम्ही भारतीय प्रथम देशाचा आंतरराष्ट्रीय स्थरावर नामुश्कीस जवाबदार तसेच मुस्लिम धर्माची भावना दुखावने तसेच देशात अशांतता तसेच जातिय दंगली घडविण्यास कारणीभूत या कारणास्तव भारतीय दंड संहिता कलम 120,अ, 121 ,124अ,142. 153.268.295.295अ,298. तसेच प्रकरणाची चौकशी करून उपरोक्त व्यक्तींवर गुन्हे दाखल करून यांना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच भारतात एकात्मता, शांतता, भाईचारा भंग तसेच भारतीय संविधान कलम 14,21.25, यास बाधा आणल्याच्या कारणाने यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी आशा प्रकारचे चार्जशिट तयार करण्याची महाराष्ट्र पोलीस यांना आदेश देण्यात यावे.
तसेच माननीय महोदय यांनी या विषयी जातीने लक्ष घालून भारतात या पुढे जातिय तेढ निर्माण करणारे वक्तव्य, टिप्पणी भाषणे, व्यंग व हालचालीस प्रतिबंध लागावा या हेतून भारत सरकार, राज्य सरकार यांनी यावर कडक कायदे व निर्बंधे लादावी याची शिफारसही आपणा कडून करण्यात यावी.
तसेच मुद्दा क्रमांक 2 मा. सुप्रिम कोर्ट यांचे कुठलेही आदेश नसताना युपी चे मुखमंत्री अजय सिंग आनंदकुमार बिष्ट ( योगी ) तसेच इतर सनातनी सूड बुध्दीने बुलडोझर राज चालवून मुस्लिम समाजाला नेस्तनाबूत करण्याच्या इराद्याने घरांवर कारवाई करीत आहेत यावरही रोख लावण्याची शिफारस यावेळी करण्यात आली पुणे जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी. असलम इसाक बागवान, रियाज बंगाली, राजू सय्यद, मुन्ना बारसकर, तौसिफ शेख
No comments:
Post a Comment