लष्कर पोलीसांनी वाहन चोराकडुन पाच मोटारसायकल सह दोन लाख रुपये किंमतींचा केला मुद्देमाल जप्त
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी पंकेश जाधव पुणे : लष्कर पोलीस स्टेशन येथे नोंद गु.रजिनं. ३३ / २०२२ भा.द.वि. कलम ३१९ मधील चोरी गेलेली मोटार सायकल होंडा कंपनीची ड्रीम योगा, काळ्या रंगाची, एम. एच १२ सी.जे २१४५ ही जान मोहम्मद स्ट्रिट, बाबाजान दर्गा जवळ, कॅम्प पुणे येथुन चोरी गेल्याची तक्रारीवर सदर भागातील जवळ जवळ ४५ सीसीटीव्ही कॅमेरी चेक केले असता एका कॅमेरीमध्ये चोरीस गेलेली मोटार सायकल ही एक इसम घोरपडी गावाच्या दिशेने घेवून जात असता दिसल्याने त्यानंतर त्याचा माग घेत असताना सरकारी व खाजगी असे एकुणे ६५ कॅमेरेच्या आधारे घोरपडी गावापर्यंत पोहचलो. त्यानंतर आम्ही घोरपडी गावातील गुप्त बातमीदारास सदरची माहीती दिली होती त्यानंतर
आम्ही स्वतः सपोनी गायकवाड, पोलीस उप निरीक्षक डोंगळे, पोहबा कैलास चव्हाण, पोहवा महेश कदम, मपोहवा मंगल लाकडे, पोना अतुल मेंगे, पोना गणेश कोळी, पोना सचिन मांजरे, पोना समिर तांबोळी, पोशि चक्रधर शिरगिरे असे लष्कर पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार कैलास चव्हाण यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की लष्कर पोलीस ठाणे हद्दीत एक संशयित इसम खान रोड, येथील सार्वजनिक मुतारी जवळ कैम्प पुणे येथे होंडा कंपनी ची मोटार सायकल ड्रीम योगा, काळ्या रंगाची, तीचा क्र. एम. एच ०५ सी.जे २१४५ घेवून संशयित रित्या हाताळत आहे. व गाड़ी चालु करण्याचा असफल प्रयत्न करीत आहे. अशी बातमी मिळताच सार्वजनिक मुतारीच्या बाजुला एक इसम त्याचे केस वाढलेले, दाढी वाढलेली त्यांने निळ्या रंगाचा हाफ बाहयाचा टी-शर्ट व खाकी रंगाची बरमुडा परिधान केलेला दिसला सदर संशयित इसम आम्हाला पाहुन ड्रीम योगा मोटार सायकल घेऊन पळुन जात असताना आम्ही स्टाफच्या मदतीने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्यांचे नाव भुषण चिमण सोळंकी, वय ३४ वर्षे, रा.वी ढवळे वस्ती, गल्ली नंबर ०३ भारत फॉर्स कंपनी रोड, गणपती मंदीरा येथे, घोरपडी गाव, मुंढवा, पुणे ३६ असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे असण्या-या मोटार सायकल ड्रीम योगा, क्र. एम. एच ०५ सी. जे २१४५ याबद्दल विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यानंतर त्यास विश्वासात घेवून विचारले असता त्यांने सदर मोटार सायकल पुणे कॅम्प येथुन चोरी केली असल्याबाबत सांगितले असता आम्ही लष्कर पोलीस स्टेशन येथील गुन्हे अभिलेख पाहीला असता सदर गाडी ही चोरीची असल्याबाबत व लष्कर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. ३३ / २०२२ मा.द.वी कलम ३७९ प्रमाणे नोंद असल्याचे खात्री झाल्याने आम्ही पोना सचिन मांजरे यांना दोन पंचाना बोलवण्यास सांगितले आसता, त्यांनी दोन इसमाना पंच म्हणुन बोलावुन घेवून बातमीबाबत थोडक्यात हकीकत सांगुन त्यांना पंच म्हणुन हजर राहणेबाबत विनंती केली असता, त्यांनी पंच म्हणून हजर राहण्यास संमती दर्शवली. त्यांनतर आम्ही स्वतः वरील पोलीस स्टाफ व पंच असे खान रोड सार्वजनिक मुतारी जवळ, कॅम्प पुणे येथे हजर असताना त्यास पंचासमक्ष त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांने त्याचे वरील प्रमाणे सांगितले.
त्यानंतर आम्ही त्याच्या ताब्यातील गाडी पंचासमक्ष ताब्यात घेतली असता तिचे वर्णन खालीलप्रमाणे कंपनी होंडा कंपनी ची ड्रीम योगा, रंग काळा क्रमांक एम. एच ०५ सी.जे २१४५, इंजीन नं JC58ET3546230, वेसीज नं E4JC589LET359563 जुवा नं अं.कि.रु. २५,०००/- असे मोटार सायकल हस्तगत केली.
सदर आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास करता त्याने चार गाडया चोरी केल्याचे तपास निष्पन्न झाले असुन मेमोरंडम पंचनाम्याने
१ ) लष्कर पोलीस स्टेशन कडील गु.र.न २५/२०२२ भा.द.वी कलम ३७९ मधील होंडा अॅक्टीव्हा मोटार स्कुटर नं. एम. एच. १२ डी. एफ ८१२५,
अं.कि.रु.२५,०००/ अं.कि.रु. ५०,०00/
२) मोटार स्कुटर नं एम.एच १२ एफ.जी ५८६६. (३) निळया रंगाची डिस्कव्हर गाडी नं एम.एच.१२ डी. एल ६९१५. अं.किं. रु.५०,०००/
(४) काळा रंगाची स्पिलेंडर गाडी नं. एम.एच १२ बीझेड ८४८८ अं.किं. रू.५०,०००/
असा एकुण २,००,०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा तपास श्री शितलकुमार गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस स्टेशन पुणे हे करत आहेत.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस उप आयुक्त श्री. सागर पाटील, परि २ मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. आर. एन. राजे लष्कर विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक कदम व पोनि (गुन्हे) प्रियंका शेळके यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस उप निरीक्षक डोंगळे, पोहवा कैलास चव्हाण, पोहवा महेश कदम, पोना समिर तांबोळी, पोहवा किसन गारमळ, मपोहवा मंगल लाकडे, पोना गणेश कोळी, पोना सविन मांजरे, पोना अतुल मेंगे, पोशि चक्रधर शिरगीरे पोशि प्रवण भोसले असे यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment