पुणे कोंढवा भागात चा छापा: दहशतवाद संशयितांवर एटीएसची मध्यरात्री कारवाई
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी; पुणे, ९ ऑक्टोबर २०२: पुण्यात पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांचा संशय निर्माण झाला असून, बुधवारी रात्री उशिरा दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त पथकाने कोंढवा परिसरात मोठी शोध मोहीम राबवली. अंदाजे १८ घरांवर झडती घेतल्या असून, काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.
रात्री उशिरा सुरू झालेली ही गोपनीय कारवाई पहाटेपर्यंत चालू राहिली. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते, ज्यामुळे एटीएसने मध्यरात्री अचानक छापे टाकण्याचा निर्णय घेतला. ही कारवाई कोंढवा परिसरातील चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पसरली असून, रॅडिकलायझेशन आणि अँटी-नॅशनल क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित आहे.
या अचानक कारवाईमुळे पुणे, महाराष्ट्र आणि देशभरात खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांनुसार, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची तपासणी सुरू असून, आणखी संशयितांवर कारवाई वाढू शकते. एटीएसने स्पष्ट केले की, कोणताही धोका पत्करला जाणार नाही आणि तपासाला गती देण्यात येईल.


No comments:
Post a Comment