पुणे माझा न्यूज | प्रतिनिधी, पुणे ; फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढले असल्यामुळे फरासखाना पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक, मा. राजेंद्र लांडगे, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद यांनी फरासखाना पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक, निलेश मोकाशी यांना पोलीस स्टेशन वाहन चोरी गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी पेट्रोलिंग करून वाहन चोरांचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक, निलेश मोकाशी व तपास पथकातील पोलीस स्टाफ फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना फिरत फिरत कुमार वेस चौक, मंगळवार पेठ येथे आला असता पोलीस अमलदार प्रविण पासलकर व पोलीस अंमलदार संदीप कावळे यांना कोंबडी पुल मंगळवार पेठ पुणे येथे एक इसम संशयीत इसम गोपेड दुवाकी घेऊन विक्रीसाठी थांबला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस स्टाफसह गेले असता बातमीप्रमाणे एक संशयीत दसम सुझुकी अक्सेस मोपेड दुचाकी एमएच-१२ टीएल-९११० राह दिसुन आल्याने त्याच्याकडे असलेल्या गाडीच्या मालकीबाबत विचारणा केली असता तो उढवा-उडवीची उत्तरे देऊ लागल्याने सदर गाडीबाबत तपास केला असता त्या गाडीबाबत फरासखाना पोलीस स्टेशन गुरजि. नं ९३/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे मधील बोरीस गेलेली गाडी असल्याचे समजले. त्यानंतर सदर आरोपीकडे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांनी अधिक तपास करता त्याने त्याचे नाव गोविंद हनुमंत घोडके, वय-२१ वर्ष, व्यवसाय-मजुरी, सध्या पंचमुखी मंदीरजवळ, •लक्ष्मीनगर, कॉलनी नं २२. येरवडा पुणे गुळ ५ नंबर चौक, पाखरसांगवी, बसवड बस्ती, स्वराजनगर वा लातुर, जि-लातुर असे सांगितले. तसेच त्याने फरासखाना पोलीस स्टेशन गुरजिन १००/२०२२ भा.द.विकल ३७९ मधील दुचाकी क्रमांक एमएच-१२एनके-४६०४ तसेच खडक पोलीस स्टेशन गुरजिन १८१/२०२२ मा वि कलम ३७९ मधील हिरो होंडा दुचाकी क्रमांक एमएच-१२ बीएफ-४४१३ ही चोरी केली असल्याची माहीती मिळाली असुन त्याच्याकडुन सदरच्या दुचाकी गाड्या जप्त करून फरासखाना पोलीस स्टेशनकडील दोन खडक पोलीस स्टेशनकडील १ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच सदर आरोपीताचा पूर्व अभिलेख तपासणी केली त्याचेवर यापुर्वी हडपसर पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम ३०० व २७९ प्रमाणे गुन्हे असून जो सन २०१५ से जानेवारी २०२२ पर्यंत येरवडा मध्यवती कारागृह येथे होता.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ पुणे डॉ. प्रियंका नारनवरे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक(गुन्हे), शब्बीर सय्यद, पोलीस उपनिरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस अंगलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, मोहन दळवी, महावीर वल्दे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, गणेश आटोळे, सुमित खुट्टे, पंकज देशमुख, तूषार खडके अजय शिंदे यांच्या पथकाने केली आहे
No comments:
Post a Comment