Breaking News | पुणे पोलिसांचा मोठा दणका! कोंढव्यात शफी पठाण–समीर पठाण टोळीवर MCOCA; १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


गुरुवार, ९ जुलै, २०२६

Breaking News | पुणे पोलिसांचा मोठा दणका! कोंढव्यात शफी पठाण–समीर पठाण टोळीवर MCOCA; १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संघटित गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई; तपासाला वेग


पुणे माझा न्युज । पुणे : दि. ९ जुलै २०२६ : पुणे शहरातील संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेत पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातील कथित शफी गुलजारखान पठाण–समीर शफी पठाण टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील संघटित गुन्हेगारीविरोधातील पोलिसांच्या मोहिमेला आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल गुन्हा क्रमांक ३५०/२०२६ तसेच संबंधित प्रकरणांमध्ये या टोळीवर MCOCA लागू करण्यात आला. त्यानंतर ८ जुलै २०२६ रोजी विशेष MCOCA न्यायालयाने आरोपींना १३ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

या टोळीविरुद्ध खंडणी, संघटित गुन्हेगारी आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीविरुद्ध खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असून, आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि इतर पुराव्यांच्या आधारे MCOCA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.


या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व) मनोज पाटील, कोंढवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.


पोलिसांच्या मते, MCOCA लागू झाल्यानंतर तपासाला अधिक गती मिळणार असून, आरोपींचे आर्थिक व्यवहार, मालमत्ता, सहकारी आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित इतर बाबींची सखोल चौकशी केली जाणार आहे.


पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरोधात "शून्य सहनशीलता" धोरण कायम ठेवत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad