Crime News | रिक्षा वळविण्याच्या वादातून खुनाचा प्रयत्न – ४ आरोपी अटकेत, गावठी पिस्टल व दुचाकी जप्त - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Friday, 10 April 2026

Crime News | रिक्षा वळविण्याच्या वादातून खुनाचा प्रयत्न – ४ आरोपी अटकेत, गावठी पिस्टल व दुचाकी जप्त

 रिक्षा वळविण्याच्या वादातून खुनाचा प्रयत्न – ४ आरोपी अटकेत, गावठी पिस्टल व दुचाकी जप्त


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : दि. ०८/०३/२०२६ रोजी पुणे महानगरपालिका क्रीडांगण, गल्ली नं. ०१, काकडे वस्ती, कोंढवा बु., पुणे येथे रिक्षा वळविण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून फिर्यादीवर धारदार शस्त्र व पिस्टलच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपींनी फिर्यादीच्या दिशेने पिस्टलमधून गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.


सदर प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९, ३२४ (४)(५), ३(५), १८९(२)(४), १९०, १९१(२)(३) तसेच आर्म अॅक्ट कलम ३, २५, २७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३(७) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकास आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. दि. १०/०३/२०२६ रोजी रात्री पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पारशी ग्राऊंड, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे येथे सापळा रचून खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले:


१) कुणाल उर्फ नन्या विनायक जाधव (वय १९ वर्षे, रा. कोंढवा, पुणे)

२) आदित्य शंकर घाबरे (वय २१ वर्षे, रा. वडगाव बु., पुणे)

३) अक्षय ज्ञानेश्वर आवळे (वय २० वर्षे, रा. वडगाव बु., पुणे)

४) शिवाजी पांडुरंग मरगळे (वय २१ वर्षे, रा. कोल्हेवाडी, पुणे)


तपासादरम्यान आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला असून त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक दुचाकी वाहन असा एकूण अंदाजे रु. ५०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सदर कारवाई मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) व तपास पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.


वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन कुमार घाडगे, मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, रविंद्र चिप्पा, रशिद शेख, सुरज शुक्ला, संतोष बनसुळे, पुष्पेंद्र चवाण, शाहिद रजपुत, हिरवे, अमित सूर्यवंशी, रियाज पटेल, प्रशांत खाडे यांच्या पथकाने केली


पुणे शहर पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहे की, अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांविषयी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे.


— कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलीस

No comments:

Post a Comment

Post Top Ad