पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराचा धक्कादायक साखळी आरोप ! मुख्य आरोपींना पैशांच्या जोरावर वाचवले, निर्दोषांना अडकवले ?
पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाणे ठरले दयावान ! मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी लाखों रुपयांची देवाणघेवाण – धक्कादायक घटना
पुणे माझा न्युज | प्रतिनिधी पुणे : दि. १७ डिसेंबर २०२५ – पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केले आहेत. गुन्हे दाखल करताना मुख्य आरोपींची नावे लाखो रुपयांच्या मांडवलीनंतर वगळली जात असल्याचा थेट दावा करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, "आज कोणाचा नंबर येईल?" अशी भीती नागरिकांना सतावत आहे.
स्थानिकांच्या मते, काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हेगारांना आर्थिक व्यवहार करून मोकाट सोडले जात आहे. तक्रारदार ठाण्यात अर्ज घेऊन गेल्यास त्यावर वर्षानुवर्षे कारवाई होत नाही, उलट त्यांना धमक्या दिल्या जातात असा आरोप आहे. विशेष म्हणजे, गुन्हे निरीक्षक मा. श्री. अमर काळंगे यांच्यावर थेट आरोप करण्यात आले आहेत की, ते दखलपात्र गुन्ह्यात आरोपींचा बचाव करतात आणि त्यांना पाठीशी घालतात.
सय्यद नगर परिसरातील ऑक्टोबर महिन्यातील या गुन्ह्यात मुख्य आरोपीचे नाव वगळण्यासाठी लाखो रुपयांची मांडवली करून वरिष्ठांना हाताशी धरल्याची जोरदार चर्चा आहे. गुन्ह्यात गुन्हेगारांच्या नावांसोबत निर्दोष लोकांना "इतर" म्हणून अटक करून, पोलीस ठाण्याच्या हस्तकांमार्फत पैशांची वसूली करून मुख्य आरोपींची नावे कमी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणातील एका भांडणात सिल्वर स्टार हॉटेल मालकाचा भाचा मारुफ हा मुख्य आरोपी असतानाही, हॉटेल मालक आयुब (जो सरकारी कर्मचारी आहे) याला चौकशीसाठी बोलावून इतकी बेदम मारहाण केली की त्याच्या पायाचे हाड मोडले! त्याला धमकी देऊन सोडण्यात आले की, "कुठेही तक्रार करू नकोस, आम्ही तुझ्या भाच्याला (मारुफला) सोडून देऊ." याच गुन्ह्यात वेस्टर्न बेकरीचा चाकू वापरला गेला आणि आरोपींनी हॉटेल व बेकरीबाहेर हत्यारे नाचवल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही, आर्थिक भ्रष्टाचार करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.
नागरिकांच्या वतीने विनंती आहे की, काळेपडळ पोलीस ठाण्यातील गैरकारभारावर स्वतंत्र समिती नेमून सखोल चौकशी करावी. आतापर्यंत दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची तपासणी करावी आणि भ्रष्टाचाराला आळा घालावा. अन्यथा परिसरातील नागरिकांचा विश्वास पोलीस यंत्रणेवर उडालेला आहे आणि दहशतीचे वातावरण अधिकच वाढेल!
हे आरोप अत्यंत गंभीर असून, पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारे आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
क्रमशः या अनुषंगाने पुरावे सहित पुढील बातमीत प्रकाशित करू


No comments:
Post a Comment