पुणे शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वसुलीसाठी दरोडा पथकचा 'वसुली बहाद्दर'
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पोलीस आणि अवैध धंदे हा काही नवीन विषय नाही. अवैध धंद्यांतून पोलिसांची दोन नंबरची कमाई होते, हे काय नवीन नाही पुणे शहरात पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी अधिकाऱ्यांना सक्ती केलेली असतानाच, त्यांच्याच खात्यातील काही अधिकारी व त्यांच्यासाठी मावा गोळा करणारे ‘वसुली बहाद्दर’ अवैध धंदे वाढीसाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
पोलिसांवर गंभीर आरोप............
काही ठिकाणी कधी-कधी छापा मारला जातो तर कधी कधी अटकसत्र सुरू होते. पुन्हा परिस्थिती जैसे थे होऊन जाते परंतु कारवाईच्या नावावर फक्त एका धंद्यावर कारवाई करून बाकीच्या ठिकाणी कागदी घोडे नाचण्याचा प्रकार पुणे पोलीस करताना पाहायला मिळत आहे
कारवाईच्या नावावर आपले पाकीट वाढवून घेण्याचा प्रकार पुणे पोलीस दलातील ‘वसुली बहाद्दर’ करताना दिसत आहेत अश्याच काही लोकांच्या आशीर्वादामुळे हे सर्व अवैध धंदे सुरू असतात परंतु पोलीस प्रशासन कधी-कधी काही करू शकत नाही. विरोधक या अवैध धंद्याचे पुरावे देतात. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. अशीच काहीसी परिस्थिती पुण्याच्या पूर्व भागातील हडपसर, वानवडी, चंदन नगर, लोणीकंद, मुंढवा, विमान नगर,पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झाली आहे.
यासाठी पुणे शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वसुलीसाठी दरोडा पथकचा ‘वसुली बहाद्दर’ ((पोलीस शिपाई अमोल सरतापे ) आपली दहशत निर्माण करून कारवाईची धमकी देऊन वसुली जोरात करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे
गेल्या अनेक दिवसांपासून हडपसर, वानवडी, पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी तेथील स्थानिक नागरिकांनी आमच्याकडे केल्या आहेत. या अवैध धंद्याच्या विरोधात आता नागरिकांना आव्हान करण्यात येते कि आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याचे व्हिडिओ किंवा फोटो आणून द्यावेत असे आवाहन पुणे माझा न्युजचे संपादक यांनी नागरिकांना केले आहे
न्यायालयात जाण्याचा इशारा..........
अवैध धंदे चालकांकडून वसुली करणारा दरोडा पथकचा ‘वसुली बहाद्दर’ ((पोलीस शिपाई अमोल सरतापे ) यावर पोलीस आयुक्त कारवाई करतील का ? अश्या चर्चेला उधाण आले असून नागरिकांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी देखील या निमित्ताने लावून धरली आहे.याबाबत लवकरच पुरावे घेऊन पोलीस अवैध धंद्यांना कसे पाठीशी घालत आहेत याचा खुलासा न्यायालयात केला जाईल.
(क्रमशः)
खूप छान
ReplyDelete