प्रेस मीडिया लाईव्हचा तिसऱ्या वर्धापन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी - प्रेस मीडिया लाईव्हचा तिसऱ्या वर्धापन निमित्त राष्ट्रीय पुरस्कार सोहळा या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. २० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वाजता प्रेस मीडिया लाईव्हद्वारे आझम कॅम्पस येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रेस मीडिया लाईव्ह या वृत्तसंस्थेचे प्रमुख मेहबूब सर्जेखान यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांचे स्वागत केले यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, भारत हे सर्वसमावेशक राष्ट्र आहे. त्याचे स्वरूप बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. भारताची अखंडता आणि सौहार्द संपवण्याचे षडयंत्र यशस्वी होऊ दिले जाणार नाही. ही निवडणूक लोकशाहीसाठी शेवटची निवडणूक असू शकते, त्यामुळे फॅसिस्ट सरकार पुन्हा येऊ देऊ नये.
डॉ.पी.ए.ईनामदार विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना रविवारी माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रेस मीडिया लाईव्ह’ या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
तर राज्यातून अनेक जिल्ह्यातून विविध पत्रकारांचा तसेच समाजसेवकांचा सत्कार करण्यात त्याच बरोबर पुणे माझा न्युजचे संपादक रियाज मुल्ला यांना निर्भीड व शोधपत्रकारीता तसेच रोखठोक लेखणी बाबत यांना दर्पण पुरस्कार तर स्टार न्युज इंडियाचे बसवराज कुंभार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रेस मिडिया लाईव्हकडून देऊन मोहन जोशी व पी ए. ईनामदार यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमाचे आयोजन प्रेस लाईव्ह मिडियाचे प्रमुख मेहबूब सर्जेखान यांनी केले होते. तर रियाज मुल्ला यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे व मेहबूब सर्जेखान यांचे आभार मानले
No comments:
Post a Comment