Pune Crime News : बोगस पत्रकाराचे व सी.बी.आय. बनावट आयकार्डचा आधार घेवुन खंडणी मागणा-या टोळीस हडपसर पोलीसांकडुन अटक - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 22 September 2021

Pune Crime News : बोगस पत्रकाराचे व सी.बी.आय. बनावट आयकार्डचा आधार घेवुन खंडणी मागणा-या टोळीस हडपसर पोलीसांकडुन अटक

पुणे माझा न्युज : प्रतिनिधी युनूस शेख : दिनांक- १४/०९/२०२१ रोजी इसम नामे दिलीप मानसिंग मेमाणे वय ३४ वर्षे धंदा भाजीविक्री रा. दादा जाधवराव हायस्कुल शेजारी जेजुरी ता. पुरंदर जि.पुणे यांना इसम नामे अनिल जगन्नाथ बोटे वय ३४ वर्षे, रा. तुकाई दर्शन, हडपसर पुणे याने “मी शिवप्रहार संघटना पुणे शहर अध्यक्ष असुन तुझ्याविरुध्द एक महिला बलात्काराची तक्रार घेवुन आमचेकडे आलेली आहे. तीला घेवुन आंम्ही लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला जाणार आहे. तु जर आम्हाला ५ लाख रुपये दिले नाही तर तुला मी बलात्काराच्या गुन्हयात अडकवुन टाकेन" असे म्हणुन फिर्यादीकडुन खंडणीची मागणी केली त्यावरुन हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर- ७५१/२०२१ भा.द.वि. कलम- ३८५,३८७,३८९, ३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दाखल गुन्हयामध्ये अनिल बोटे यास सहा पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी अटक केलेली होती. 

दाखल गुन्हयातील फिर्यादी दिलीप मेमाणे यांचेकडे गुन्ह्यासंदर्भाने त्यांना विश्वासात घेवून पुंन्हा अधिक चौकशी करत असताना त्यांनी सांगीतले की, इसम नामे राहुल हरपळे, अनिल बोटे, स्वप्नील धोत्रे, शिवा खरात व मारुती निचीत यांनी सर्वांनी मिळुन मेगा सेटर मगरपट्टा येथील ऑफिसमध्ये त्यांचेविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करु नका असे म्हणण्यास गेल्यावर त्यांनी सर्वानी मिळुन फिर्यादीस “तु ५ लाख रुपये नाहि दिले तर, तुझे काहि खर नाही, तुला पैसे द्यावेच लागतील” असे म्हणुन शिवीगाळ व धमकी देवुन पुन्हा पैशांची मागणी केली व अनिल बोटे याने ऑफिसमधील खुर्चीने त्यांना मारहाण केली. तसेच मारुती
निचीत याने त्याचे खिशातुन बनावट सीबीआय आयपीएस अधिकारीचे आयकार्ड दाखवुन “तुला आमचे सर्वाचे ऐकावेच लागेल. तुला दुसरा पर्याय नाही” असे म्हणुन पैशांची मागणी केली. राहुल हरपळे या व्यक्तीने मारुती निचीत यास तसेच आणखी ५ लोकांना अशाच प्रकारे पत्रकारीतेचे तसेच सीबीआय अधिकारीचे बनावट आयकार्ड बनवुन दिलेले आहे. तसेच तो स्वत. महाराष्ट्राचा प्रहारचे वेब पोर्टलचा वापर करुन ऑनलाईन बातमी देत आहे. व त्याआड अशाच प्रकारे लोकांना खंडणी मागत आहेत. त्यावरुन दाखल गुन्हयामध्ये ४६४, ४६५, ४६८, ४७१ १७० १७१ प्रमाणे कलमवाढ करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान हडपसर पोलीस स्टेशनकडील हनुमंत गायकवाड सहा. पोलीस निरीक्षक यांनी इसम नामे १) राहुल मच्छीद्र हरपळे वय ३३ वर्षे रा. चंदवाडी जुन्या कॅनाल शेजारी फुरसुंगी पुणे. २) संतोष ऊर्फ शिवा उत्तम खरात वय २६ वर्षे रा. कामठेमळा सम्राट गार्डन समोर लोहिया गार्डनमागे हडपसर पुणे. मुळगाव- मु.पो. वाकडी ता.राहता जि. अहमदनगर ३) स्वप्नील विजय धोत्रे वय २४ वर्षे रा. प्लॅट I नंबर- ५०४. छाया निवास शिवशंभोनगर व्हीआयआयट कॉलेजच्या मागे पठाण चौक, कोंढवा पुणे. मुळगाव मु.पो. उत्तर जेवळी ता.उमरगा जि.उस्मानाबाद ४) मारुती लहु निचीत वय ३९ वर्षे रा. वडनेर खुर्द ता. शिरुर जि.पुणे यांचा दाखल गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने यांना अटक केलेली आहे. या सर्वांनी अशाच प्रकारे आणखी लोकांना पत्रकार तसेच तोतया सीबीआय अधिकारी तसेच संघटनेचा पदाधिकारी असल्याची बतावणी करुन लोकांना घाबरवून खंडणी मागितल्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्री. नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा. श्री. कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर पोनि. (गुन्हे) श्री. राजु अडागळे, पोनि (गुन्हे) श्री. दिगंबर शिंदे यांचे
सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, गणेश क्षीरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदिप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव पोलीस शिपाई शाहिद शेख, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सुरज कुंभार, निखील पवार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad