पुणे माझा न्युज पुणे : काही दिवसापूर्वी विश्रांतवाडी हद्दीत वाहतूक पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना तेथून त्याने रिक्षा घेऊन पळ काढला त्याप्रमाणे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून दाखल गुन्ह्यातील आरोपी रिक्षा ड्रायव्हर हा गुन्हा करून पळून गेला होता. सदर संशयीत आरोपीचा शोध घेणेकामी मा. पोलीस निरीक्षक, (गुन्हे) विश्रांतवाडी पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पथक तयार करून त्याचा खडकी, बोपोडी भागात शोध घेत असताना पोलीस अंमलदार संदिप देवकाते, शेखर खराडे यांना त्यांचे बातमीदारामार्फ माहिती मिळाली की सदरचा संशयीत आरोपी रिक्षा चालक हा चाकण आठवडा बाजारात दि. ३०/०९/२०२१ रोजी रात्रौ २०.०० वा चे सुमारास येणार
असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने मा. पोनि गुन्हे सोा, यांचे आदेशा प्रमाणे पोउनि एल आर सातपुते, पो.हवा चव्हाण, पोशि देवकाते, पोशि मोरे, पोशि खराडे असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावून बातमीच्या अनुषंगाने चाकण आठवडा बाजार येथे सापळा लावून थांबले तेव्हा दाखल गुन्हयातील फिर्यादीमधील वर्णनाचा संशयीत इसम रिक्षा चालक हा २०.१५ वा च्या सुमारास चाकण आठवडा बाजारात रिक्षामधून उतरताना दिसला त्याचा संशय आल्याने व तोच संशयित आरोपी असल्याची खात्री झाल्याने स्टाफच्या मदतीने त्यास जागेवरच पकडुन ताब्यात घेवून त्यास त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आरमोगम कंदस्वामी पिल्ले, रा. सर्वे नं २४, सावंत नगरी, पत्राचाळ, बोपोडी पुणे असे असल्याचे सांगीतले त्यांचेकडे तपास करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केला तसेच त्याचे ताब्यातील रिक्षा क्र एम एच १४ एच एम ८०८० हीचे बाबत त्याचेकडे अधिक तपास केला असता असता त्याने सदरची रिक्षा बोपोडी, खडकी पुणे येथून चोरल्याचे सांगीतले. खडकी पोलीस स्टेशन येथे खात्री करता सदर रिक्षाबाबत खडकी पोलीस स्टेशन येथे गुरनं २८६/२०२१ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे माहिती मिळाली. आरोपीस दाखल दि. ३०/०९/२०२१ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्री नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री रमेश गलांडे, सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे, मा. श्री अजय चांदखेडे, वपोनि विश्रांतवाडी तसेच विजयकुमार शिंदे, पो नि गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री लहु सातपुते पो.हवा. विजय सावंत, दिपक चव्हाण पो.ना. यशवंत किर्वे, पो.शि प्रफुल मोरे, शेखर खराडे, संदिप देवकाते, शिवाजी गोपनर, योगेश चांगण यांचे पथकाने केली आहे.
No comments:
Post a Comment