Pune Crime | Dhanori Lohogaon | लग्नाच्या आमिषाने 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार ! ‘त्या’ गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरासह दोघे जाळ्यात - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 22 September 2021

Pune Crime | Dhanori Lohogaon | लग्नाच्या आमिषाने 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार ! ‘त्या’ गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरासह दोघे जाळ्यात

पुणे माझा न्युज : प्रतिनिधी इम्रान पुनावाला : पहिले लग्न झाले असतानाही ते लपवून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली असताना गोळ्या देऊन तिचा गर्भपात करणार्‍या डॉक्टरासह दोघांवर लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

आशिष शैलेश सपकाळ Aashish Shailesh Sapkal (वय ३४, रा. लोहगाव) आणि डॉ. दत्ता खैरनार Dr. Datta Khairnar (रा. धन्वंतरी हॉस्पिटल, धानोरी - Dhanwantari Hospital, Dhanori) अशी गुन्हा (Pune Crime) दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी मांजरी (Manjari) येथील २५ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२० ते जून २०२१ दरम्यान घडला होता. फिर्यादी आणि आरोपी सपकाळ हे ओळखीचे आहेत. सपकाळ याने आपले लग्न झाले असल्याचे लपवून फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले. घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यांच्यासोबत अश्लिल चाळे केले. तसेच लोणावळा (Lonavala), वडकी (Wadki), भेकराईनगर येथील लॉजवर नेऊन त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यातून त्यांना पावणे दोन महिन्यांच्या गरोदर राहिल्या असताना त्यांना गोळ्या देऊन डॉक्टरकडून गर्भपात (Abortion) करविला. तसेच फिर्यादी यांच्या सोबत शरीर संबंध ठेवतानाचे व्हिडिओ, फोटो फिर्यादीच्या परवानगीशिवाय काढले. फिर्यादी यांच्यासोबत लग्न न करता हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. म्हणून फिर्यादीने तक्रार दिली असून ही फिर्याद वानवडी पोलिसांकडे (wanwadi police) वर्ग करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad