उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो, शिवाजीनगर येथील कामाची पाहणी - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Friday, 25 September 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो, शिवाजीनगर येथील कामाची पाहणी

पुणे दि.25:  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे सहा वाजता  पुणे स्टेशन येथे जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.

                                 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो( वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी करून मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहीती दिली. 




उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे मॉडेल  ट्रेनने प्रवास केला.  शिवाजीनगर येथे बोगदा काम,  व्हील पार्क येथील कचरा डेपोचे अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, येथील कामाचीही उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. मेट्रोच्या रेणू गेरा यांनी या मेट्रो डेपो उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad