हडपसर पोलिसांची अविश्वसनीय कामगिरी, 18 गावठी पिस्तूल व 27 जिवंत काडतूसा सह 6 जणांना अटक - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Tuesday, 22 September 2020

हडपसर पोलिसांची अविश्वसनीय कामगिरी, 18 गावठी पिस्तूल व 27 जिवंत काडतूसा सह 6 जणांना अटक

पुणे माझा न्युज- प्रतिनिधी : मजहर शेख :-  18 गावठी पिस्तूल व 27 जिवंत काडतूसे जवळ बाळगणा-या सहा जणांना हडपसर पोलिसांनी सापळा रचून रविवारी (दि.20) अटक केली. त्यांच्याकडून 18 गावठी पिस्टल, 27 जिवंत काडतूसे व एक चोरीची दुचाकी असा एकूण 5.68 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हडपसर पोलीसांची पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील आजवरची ही सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे.अरबाज रशिद खान (वय 21, रा. शिरुर, ता. शिरुर जि. पुणे), सुरज रमेश चिंचणे ऊर्फ गुळया (वय 22, रा. गंगानगर, वरद विनायक कॉलनी, फुरसुंगी, पुणे), कुणाल नामदेव शेजवळ ऊर्फ यश (वय 19 रा. शिरुर, बुरुड आळी, ता. शिरुर जि. पुणे), जयेश राजू गायकवाड ऊर्फ जय (वय 23, रा.शिरुर, लाटे आळी, ता. शिरुर जि. पुणे), विकास भगत तौर ऊर्फ महाराज (वय 28, रा. लक्ष्मीनगर येरवडा, पुणे), शरद बन्सी मल्लाव (वय 21 रा मु. पो. काचेआळी, ता. शिरुर जि. पुणे), अशी अटक आरोपींची नावे आहेत.

अटक आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या पूर्वी त्यांच्यावर पुणे शहर व पुणे ग्रामीण परिसरात पिस्तुल तस्करीचे, तसेच मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी अरबाज रशिद खान हा मंचर पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण यांचे गुन्हयात हवा असलेला आरोपी आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथील कानिफनाथ वस्ती येथे मोकळ्या मैदानावर सहा जण संशयितरित्या थांबले असून त्यांच्या कमरेला पिस्टल असल्याची गुप्त माहिती हडपसर पोलिसांनामिळाली. त्यानुसार नुसार पोलिसांनी याठिकाणी सापळा रचून संशयित आरोपींनी ताब्यात घेतले.आरोपींचा झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ 18 गावठी पिस्टल, 27 जिवंत काडतूसे व एक चोरीची दुचाकी असा एकूण 5 लाख 68 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून त्यांचा मध्यप्रदेश राज्याचे पिस्तुल तस्करीच्या साखळी बाबत अधिक तपास सुरू आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad