Breaking News | चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भेंड्यात हरित क्रांतीचा संकल्प; ५० हून अधिक देशी वृक्षांची लागवड - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

Breaking News | चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भेंड्यात हरित क्रांतीचा संकल्प; ५० हून अधिक देशी वृक्षांची लागवड

चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भेंड्यात हरित क्रांतीचा संकल्प; ५० हून अधिक देशी वृक्षांची लागवड


पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक


पुणे माझा न्युज | प्रतिनिधी: भेंडा बुद्रुक (सुहास वेताळ): लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार मा. चंद्रशेखरजी घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भेंडा बुद्रुक येथे सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पर्यावरणाचा समतोल राखणे, वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षसंवर्धनाला चालना देणे आणि परिसर अधिक हिरवाईने नटवणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ५० हून अधिक देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये पिंपळ, वड, कदंब यांसह विविध फळझाडे व सावली देणाऱ्या वृक्षांचा समावेश होता.

वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा न देता पर्यावरण संवर्धनाचा विधायक संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आल्याने परिसरातून या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

या प्रसंगी उपस्थितांनी मा. चंद्रशेखर घुले पाटील यांना निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वृक्षारोपण कार्यक्रमात भेंडा बुद्रुक व लांडेवाडी परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पर्यावरण संवर्धनाबाबतची सकारात्मक भूमिका यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. “एक व्यक्ती–एक वृक्ष” आणि “वृक्ष लावा, वृक्ष जगवा” या भावनेतून भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपण उपक्रमामुळे भेंडा परिसरात हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad