अवैध धंदे करणाऱ्या टोळीला तोतया पत्रकारांचे संरक्षण; लखन राजपूत व हाडक्या टोळीचा हैदोस
लाल–काळा जुगार प्रकरण : “अवैध जुगाराचे जाळे पुण्यात सक्रिय?; पत्रकारांना धमकावल्याचा गंभीर आरोप”
पुणे माझा न्युज । पुणे | प्रतिनिधी : पुणे शहरात सर्वत्र अवैध धंद्यांना बंदी असताना पुणे शहरा लगत तसेच शहरातील काही ठिकाणी लाल काळा (जुगार) खेळाचे रॅकेट, अंदर बाहेर जुगार सरार्सपणे ही टोळी चालवत असल्याचे काही व्हिडिओ आमच्या प्रतिनिधींच्या हाती लागल्याने ते प्रसारित करण्यात आल्याने जुगार चालकांमध्ये खळबळ उडाली आहे तसेच या टोळीने कोरेगाव भीमा, रांजणगाव, देगाव, म्हाळुंगे, वाघोली, लोहोगाव या ठिकाणी नागरिकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात येणाऱ्या गरीब जनतेची लूट ही टोळी करताना दिसत आहे
________________________________________
🔻 कुठे-कुठे धंदे सुरु आहेत
• कोरेगाव भीमा
• रांजणगाव
• देगाव
• म्हाळुंगे
• वाघोली
• लोहगाव
स्थानिकांच्या मते, या ठिकाणी बाजारात येणाऱ्या लोकांना “उच्च रक्कमेचे आमिष” दाखवत खेळामध्ये ओढले जाते. काही खेळाडू स्वतःला ग्राहक म्हणून दाखवून फसवणूक करत असल्याचे चित्र समोर आल्याने या सर्वांची माहिती पत्रकाराने गोळा केल्याने जुगार चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
________________________________________
🔻 लोहगावमध्ये खुलेआम जुगार सुरू असल्याचा दावा — व्हिडिओ व्हायरल
रविवारी लोहगाव बाजारात काही व्यक्तींनी खुलेआम जुगार खेळ सुरू केल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून, त्यासंबंधी व्हिडिओ सोशल मीडियावर फिरल्याने स्थानिकांचा आरोप आहे की, पोलिसांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुले आव्हान देत हा खेळ चालवला जात होता.
________________________________________
🔻 पत्रकारावर दबाव? — संपादकांचा आरोप
व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर जुगार चालक लखन रजपूत याने स्वतःला राजकीय पदाधिकारी म्हणून ओळख देत पत्रकारावर बातमी डिलीट करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप संपादक रियाज मुल्ला यांनी केला आहे.
तसेच काही तोतया पत्रकारांनीही या कथित रॅकेटला संरक्षण दिल्याची माहिती आल्याचे संपादकीय सूत्रांनी सांगितले.
_______________________________________
🔻 पोलिसांची प्रतिक्रिया — “अवैध धंद्यांना थारा नाही”
संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले: “आमच्या हद्दीत कोणतेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. विश्वसनीय माहिती मिळताच तातडीने कारवाई केली जाईल.”
________________________________________
🔻 पोलिस आयुक्तांकडे तक्रार
उपलब्ध व्हिडिओ, पुरावे आणि तक्रारींसह लवकरच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन या रॅकेटविरोधात औपचारिक निवेदन देण्यात येणार असल्याचे संपादक रियाज मुल्ला यांनी सांगितले.
________________________________________




No comments:
Post a Comment