Suspension of Traffic Police | पुणे पोलिस दलात खळबळ.! दोन पुरुष आणि एक महिला अशा तीन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Sunday, 8 June 2025

Suspension of Traffic Police | पुणे पोलिस दलात खळबळ.! दोन पुरुष आणि एक महिला अशा तीन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित


पुणे पोलिस दलात खळबळ! दोन पुरुष आणि एक महिला अशा तीन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित

 

पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुणे पोलिस दलात खळबळ! दोन पुरुष आणि एक महिला अशा तीन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या ड्युटीच्या ठिकाणी न जाता, हे कर्मचारी भलत्याच ठिकाणी वसुली करत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिले. चौकशीत दोषी आढळल्यानंतर तिन्ही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलिस प्रशासनाने अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत

 

वरिष्ठांनी ड्युटी लावलेल्या ठिकाणी न जाता भलत्याच ठिकाणी वसुली करणाऱ्या वसुली बहाद्दरांना चांगलाच दणका दिला आहे. वरिष्ठांनी दखल घेत पुणे वाहतूक विभागाने तात्काळ कारवाई करत ३ वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. हे पोलीस वाहतूक नियंत्रणाकडे दुर्लक्ष करून वाहन चालकांकडून दंड वसूल करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दोन पोलिस कर्मचारी व एक महिला कर्मचारी निलंबित.! वरिष्ठांनी ड्युटी लावलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिस गेलेच नाही, भलत्याच ठिकाणी करत होते वसुली 

१) संतोष चंद्रकांत यादव, २) बालाजी विठ्ठल पवार आणि ३) महिला पोलीस शिपाई मोनिका प्रवीण करंजकर अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

यादव यांची ड्युटी SP चौकात, पवार यांची हिराबाग चौकात, तर करंजकर यांची ड्युटी भावे चौकात होती. मात्र त्यांनी आपापल्या चौकात न राहता पुरम चौकात जाऊन वाहन चालकांना थांबवत दंड आकारत असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे 

ही बाब स्पष्ट होताच वाहतूक विभागाने कोणतीही दिरंगाई न करता तिघांनाही निलंबित करण्यात आले आहे. पुणे शहरात रोजचीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असताना, नियोजना ऐवजी दंड वसुलीवर भर देणं ही गंभीर बाब मानली जात आहे. वरिष्ठांनी असे नियमबाह्य काम करणाऱ्यांची कुंडली काढून इतर ठिकाणीही असेच स्टिंग ऑपरेशन करावे अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad