Pune Crime News | मोटारसायकल वरून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना युनिट-४ गुन्हे शाखेने मुद्देमालासह पकडले - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Friday, 4 July 2025

Pune Crime News | मोटारसायकल वरून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना युनिट-४ गुन्हे शाखेने मुद्देमालासह पकडले

पुणे क्राइम न्यूज: मोटारसायकलवरून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना युनिट-४ गुन्हे शाखेने मुद्देमालासह पकडले


पुणे माझा न्युज। प्रतिनिधी : पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. येरवडा परिसरात मोटारसायकलवरून जबरी चोरी करणाऱ्या दोन शातिर आरोपींना पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. आरोपींची नावे सद्दाम इसाफ पठाण (वय २८, रा. सुरक्षानगर, येरवडा) आणि  रोहित किरण पवार (वय १९, रा. अशोकनगर, येरवडा) अशी आहेत. 

पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त श्री.पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त श्री.विवेक मिसाळ, आणि सहायक पोलीस आयुक्त श्री.राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अजय वाघमारे यांच्या पथकाला १ जुलै २०२५ रोजी गुप्त माहिती मिळाली. माहितीनुसार, दोन इसम डेक्कन कॉलेजच्या मोकळ्या परिसरात काळ्या रंगाच्या स्प्लेंडर प्लस मोटारसायकलवर फिरत असल्याचे कळले. 


पोलिसांनी तात्काळ कारवाई करत डेक्कन कॉलेज परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, रोहित पवार याच्या ताब्यातील एक मोबाइल हँडसेट आढळला. त्याने कबूल केले की, आठ दिवसांपूर्वी त्याने आणि सद्दाम पठाण याने सावंत पेट्रोल पंप ते कॉमर्स झोन रोडवर एका व्यक्तीचा मोबाइल हिसकावला होता. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४२४/२०२५ अंतर्गत भा.न्या.सं. कलम ३०४(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल आहे. 

पोलिसांनी पंचासमक्ष अंगझडती करून वन प्लस नॉर्ड-४ (काळा रंग), ओपो कंपनीचा मोबाइल, आणि काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (MH-12-VH-4066) असा एकूण ८०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

ही यशस्वी कारवाई युनिट-४ चे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक फौजदार प्रवीण राजपूत, एकनाथ जोशी, प्रवीण भालचीम, विठ्ठल वाव्हळ, किशोर दुशिंग, अमजद शेख, वैभव रणपिसे, देविदास वांढरे, मयुरी नलावडे यांच्या पथकाने केली. या कारवाईने पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. पुढील तपास येरवडा पोलीस ठाणे करत आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad