Breaking News Pune | पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ, परिमंडळ अधिकारी अमोल हाडे यांच्यावर हप्ता वसुलीचे आरोप - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Thursday, 3 July 2025

Breaking News Pune | पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ, परिमंडळ अधिकारी अमोल हाडे यांच्यावर हप्ता वसुलीचे आरोप

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ, परिमंडळ अधिकारी अमोल हाडे यांच्यावर हप्ता वसुलीचे आरोप

 

पुणे माझा न्युज। प्रतिनिधी: पुणे शहरातील अन्न धान्य वितरण कार्यालयातील अनागोंदी व वसुलीचा प्रकार ऐन पावसाळी अधिवेशनात आल्याने पुणे शहरात एकप्रकारे खळबळ उडाली आहे. अन्न धान्य विभागावर यापूर्वीही अनेक आरोप देखील झालेत. तर मागच्या अधिवेशनात स्वत अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात खुलासा करत कारवाईचे आश्वासन दिले होते. परंतु ते फक्त आश्वासनेच राहिले. पुणे शहरात धान्याचा काळाबाजार होत असताना अधिकारी सर्व आलबेल असल्याचे भासवत होते तर का? कारण अन्न धान्य वितरण अधिकारीच हफ्तेखोर झाला आहे. कारण त्यांचे संबंध अन्न व नागरि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हाताखाली लोकांपर्यंत सेंटीग असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे. मग असे सेंटीग करून आलेले अधिकाऱ्यांना अजितदादा पवार व छगन भुजबळ घरी बसवण्याची सेटींग करणार का? असा प्रश्न आज पुण्यातील जनता विचारत आहे. गोरगरिबांच्या हक्काचा धान्यावर डल्ला मारणाऱ्या ह " परिमंडळ अधिकारी व त्यांना मदत करून हफ्ते वसुली करणाऱ्या अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. 

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ याची दखल घेणार का ?

" थेट रेशनिंग दुकानदाराचे आरोप आणि पुणे शहरात खळबळ " 



पुणे शहरातील अन्न धान्य वितरण अधिकारी ( अतिरिक्त कार्यभार) प्रशांत खताळ व ह परिमंडळ अधिकारी अमोल हाडे याच्यावर त्यांच्या भागातील स्वत दुकानदाराने आरोप लावल्याने खळबळ उडाली आहे. तर अख्या पुणे शहरात चर्चेला उधाण आले आहे. अमोल हाडे याच्यावर यापूर्वीही अनेक आरोप, तक्रारी झाल्याची अधिकृत सुत्रांनी माहिती दिली आहे. पावसाळी अधिवेशन चालू असल्याने आता यावर काय कारवाई होईल याकडे लक्ष वेधून राहणार आहे.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुणे शहरात चाललंय तरी काय.? 

 
यापूर्वीही प्रशांत खताळ यांच्या आनंदाचा शिधा धान्याची अफरातफरीचा आरोप? 


शासनाने आनंदाचा शिधा गोरगरिबांपर्यंत पोहचावा यासाठी आनंदाचा शिधा आणला परंतु ह" परिमंडळ विभागात हा आनंदाचा शिधा लोकांपर्यंत पोहोचलाच नसल्याच्या तक्रार झाल्या तर अनेक वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळी प्रशांत खताळ यांनी पत्रकारांना म्हणाले होते की आनंदाचा शिधा गहाळ झाला असून आम्ही तो बाहेरून खरेदी करून लोकांपर्यंत पोहचवला आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी न करता खताळ यांना पाठीशी घातल्याचा आरोप केला आहे.

 " पत्रकारांनी घेतली पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट "


पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन त्यांनी पत्रकारांनी प्रशांत खताळ व अमोल हाडे यांच्यावरील आरोपांबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले आम्ही याची स्पेशल ऑफिसर द्वारे चौकशी करू चौकशी अंती तथ्य निघाल्यास आरोप झालेल्यांना थेट घरी बसविण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Top Ad