Kondhwa Power Cut for Builder's | कोंढव्यात बिल्डरच्या बांधकामासाठी नागरिकांना वेठीस धरून वीज खंडित; ओव्हरहेड वायरिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Monday, 16 June 2025

Kondhwa Power Cut for Builder's | कोंढव्यात बिल्डरच्या बांधकामासाठी नागरिकांना वेठीस धरून वीज खंडित; ओव्हरहेड वायरिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका

कोंढव्यात बिल्डरच्या बांधकामासाठी नागरिकांना वेठीस धरून वीज खंडित; ओव्हरहेड वायरिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : एमएसईबी कर्मचाऱ्यांवर नागरिकांचा गंभीर आरोप - कोंढवा भागात, शिवनेरी नगर गल्ली नं. १ मध्ये अनधिकृत बांधकामासाठी वीज खंडित केल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, म्हणजेच एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत. एका अनधिकृत बांधकाम करणाऱ्या इकबाल नावाच्या बिल्डरच्या सोयीसाठी एमएसईबी कर्मचाऱ्यांनी दिवसभर वीज खंडित केल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे केवळ नागरिकांची गैरसोय झाली नाही, तर ओव्हरहेड वायरिंगमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 


हा प्रकार आहे कोंढव्यातील शिवनेरी नगर गल्ली नं. १ येथील. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इकबाल बिल्डरच्या अनधिकृत बांधकामाला अडथळा येत असल्याने, एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ ओव्हरहेड वायरिंगचे काम हाती घेतले. मात्र, यासाठी परिसरातील वीजपुरवठा दिवसभर खंडित करण्यात आला, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, ही ओव्हरहेड वायरिंग नागरिकांच्या घरांसमोरून गेली असल्याने, त्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका असताना याकडे एमएसईबीचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

 

दोन फूट बांधकाम वाढवण्यासाठी ही तत्काळ वायरिंग काढण्यात आली आहे या ठिकाणी मस्जिदच्या व शाळे समोरून ही ओव्हरहेड वायरिंग गेली असताना कर्मचाऱ्यांना ती दिसत नाही बिल्डरने फेकलेल्या तुकड्यांवर हे काम एमएसईबीचे कर्मचारी यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे

नागरिकांच्या म्हणन्यानुसार याठिकाणी त्यांना काहीच माहिती देण्यात आली नाही. सकाळपासून लाईट नाही, आणि आता ही वायरिंग नागरिकांच्या घरासमोरून गेली आहे. कधीही अपघात होऊ शकतो. बिल्डरसाठी इतक्या तातडीने काम का केलं जात आहे? "एमएसईबीचे कर्मचारी बिल्डरच्या सांगण्यावरून काम करत आहेत. यांच्या तक्रारींकडे कोणीच लक्ष देत नाही. ही वायरिंग इतकी धोकादायक असून मुलांच्या जीवाला धोका आहे." हा सवाल येथील स्थानिक नागरिक करत आहेत


यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, बिल्डर आणि एमएसईबी कर्मचाऱ्यांमधील संगनमतामुळे त्यांच्या सुरक्षेशी खेळ खेळला जात आहे. यापूर्वीही, पुण्यातील वाघोली येथे असाच प्रकार घडला होता, जिथे एमएसईबी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना वेठीस धरल्याचा आरोप झाला होता.

यासंदर्भात पुढील कारवाई काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नागरिकांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. खरोखरच चिंताजनक प्रकार आहे. एमएसईबी आणि संबंधित यंत्रणांनी यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पुढील बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा.



No comments:

Post a Comment

Post Top Ad