विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाची कामगीरी. मोटार सायकली चोरणाऱ्या तिघांना अहिल्यानगर येथून अटक करण्यात विश्रांतवाडी पोलीसांना यश
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले वाहन चोरीचे गुन्हयांचा तपास, तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पोहवा १७६२ विशाल गाडे, पोशि १००२९ प्रमोद जाधव हे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषण द्वारे करत असताना मोटार सायकली चोरुन नेणारे चोर हे जामखेड भागातील असल्याची माहिती मिळाल्याने त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी पोउनि महेश भोसले यांनी तपास पथकातील अंमलदार पोहवा ७४३५ बादरे, पोहवा ७३२२ भोसले, पोहवा ६४६६ शेख, पोशि २६८२ चपटे, यांची टिम तयार करून जामखेड भागात रवाना केली त्यांनी तेथील स्थानिक पोलीसांचे मदतीने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषना मधील आरोपींचा शोध घेवून संशयीत इसम नामे १) आतीक बाबा शेख वय २२ रा. कवडगाव, ता. जामखेड जि. आहिल्यानगर २) चांद नुरमहंमद शेख वय २० वर्षे, रा पिंपरखेड, ता. जामखेड जि. आहिल्यानगर ३) चेतन ज्ञानेश्वर साळवे वय १९ वर्षे रा रामगडवस्ती, कळस माळवाडी, पुणे यांना विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे आणून अटक करुन त्यांचेकडून १,८५,०००/- रुपये किंमतीच्या मोटार सायकली (बुलेट, पल्सर व ज्युपीटर) हस्तगत केल्या आहेत.
आतापर्यंत आरोपींकडे केलेल्या तपासात विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुरनं ११२/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ कलम ३०३ (२), ३ (५) व बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुरनं ५७/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ कलम ३०३ (२) हे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. हिंमत जाधव, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, मा. विठ्ठल दबडे सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, मा.श्रीमती कांचन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री मंगेश हांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री महेश भोसले, पोलीस उप निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, पोउनि विशाल माने, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे, प्रमोद जाधव यांनी केली आहे
No comments:
Post a Comment