खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपींना अवघ्या ०६ तासामध्ये केले जेरबंद
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : दि.२५/०४/२०२५ रोजी सायं. १६/४५ वा.चे सुमा. शांतीनगर, वानवडी पुणे येथील सरकार मान्य ताडीच्या दुकानावर मयत इसम नामे. मलंग महेबुब कुरेशी वय. ६० वर्षे, रा. शिवनेरीनगर कोंढवा खुर्द पुणे यांना आरोपी नामे. आदिल शेख, आकाश धांडे व पांडा या तिघांनी मिळुन ताडी पिण्याचे कारणावरुन जिवे ठार मारले आहे म्हणुन त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १७८/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३ (१), ११५ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला होता. यातील आरोपी हे स्वतःची अटक चुकवुन पोलीसांना गुंगारा देवुन पलायन करीत होते.
गुन्हे शाखा युनिट ०५ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांचे दिमतीमध्ये पथकाकडील पोलीस अंमसदार असे गुन्हयामधील पाहिजे आरोपींचा माग काढुन कसोशिने शोध घेत असताना सहा. पोलीस फौज. राजस शेख व पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन गुन्हयामधील पाहिजे आरोपी नामे. १) अदिल हनीफ शेख, वय. ३१ वर्षे, रा. लेन नंबर १८ मोघल हॉल जवळ शिवनेरी नगर कोंढवा खुर्द पुणे २) पांडुरंग नामदेव पवार, वय. ५० वर्षे, रा. समतानगर वसाहत, साईबाबा मंदीरचे मागे कोंढवा खुर्द पुणे यांना कोहिनुर सोसायटीचे अलीकडे, सार्वजनिक रोडवर, कोंढवा खुर्द पुणे याठिकाणावरुन गुन्हा घडल्यापासुन अवघ्या ०६ तासाचे आतमध्ये ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही कामी वानवडी पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे. यातील आरोपी नामे. पांडुरंग नामदेव पवार हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे (अति. कार्यभार) पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले, प्रमोद टिळेकर, विनोद निंभोरे, उमाकांत स्वामी, अकबर शेख, अमित कांबळे, शहाजी काळे, प्रताप गायकवाड, राहुल ढमढेरे, सुहास तांबे कर, संजयकुमार दळवी, महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे, स्वाती तुपे व शुभांगी म्हाळशेकर यांचे पथकाने केली.
No comments:
Post a Comment