False Case Filed Against a Reporter | मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या विरोधात; पत्रकार संघाने घेतली आयुक्तांची भेट - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Friday, 18 April 2025

False Case Filed Against a Reporter | मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या विरोधात; पत्रकार संघाने घेतली आयुक्तांची भेट

 लोकशाहीचा चौथा स्तंभांचा गळा घोटण्याचा प्रयत्न



मार्केटयार्ड पोलिसांचा पत्रकारांची मुस्कटदाबीचा प्रयत्न.! बातमी प्रसारित केल्याने एका पत्रकावर खोटा गुन्हा दाखल केल्याने पत्रकार सघांने पोलिस आयुक्तांची घेतली भेट


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी: दिवसभरात पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दररोज काही न काही अपराध घडत असतात त्या नुसार पोलीस यंत्रणा काम करत असते पोलीस म्हणजे जनतेच्या सेवेसाठी व सुरक्षेसाठी असतात काही दिवसांपूर्वी एक तक्रारदाराला वारंवार तक्रार देऊन देखील पुढील तपास किंवा पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने व्हिडिओ व्हायरल केला होता तो व्हिडिओ प्रसार माध्यमावर प्रकाशित झालेने पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुण्यातील मार्केटयार्ड पोलीस ठाण्याची याच पोलीस ठाण्यात कायद्याचा गैरवापर करून पत्रकारांची मुस्कटदाबीचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका समाजिक कार्यकर्ते यांच्या घरातील सामान काहीजण रिक्षातून चोरून नेल्याची तक्रार त्यांनी ११२ नंबरवर कॉल करून माहिती दिली. परंतु त्या ठिकाणी दोन पोलिस आले माहिती न घेता निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्या नंतर समाजिक कार्यकर्ते यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलिस उपायुक्त यांच्याकडे दाद मागितली व व्हिडिओ म्हणून पुरावे देखील दिले. परंतु त्याला कोणतीही  दाद देत नसल्याने समाजिक कार्यकर्ते यांच्यावर अन्याय करण्यात आला व्हिडिओ मध्ये सामान चोरून नेणारे दिसत असतानाही पोलिसांनी कारवाई न केल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतरांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. व सामान चोरणारे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत करण्यात आला होता याची दखल घेत पुण्यातील एका पत्रकाराने त्यांच्या  इंस्टाग्राम पेजवर तो व्हिडिओ काही दिवसांपूर्वी प्रसारित केला होता. तो व्हिडिओ पाहून काहींनी व्हिडिओ डिलीट करण्यासाठी संबधित प्रतिनिधींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु सामाजिक भावनेतून न्याय मिळवून देण्याच्या हेतूने त्या दबावाला न घाबरता निर्भिड पत्रकारिता केल्यामुळे मार्केटयार्ड पोलिसांनी पहिल्यांदा NCR ( एनसी) दाखल केला. एनसी दाखल करून दोन दिवस उलटले असतानाच एनसीतील तीच कलमे लावून पुन्हा त्यांनी गुन्हा दाखल केला.  



परंतु मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात दिवसाभरात असे कित्येक तक्रारदार येत असतात अशा तक्रादारांना तक्रारी अर्ज करावयास सांगितले जाते परंतु हातोहात त्याला न्याय मिळत नाही किंवा सहकार्य देखील केले जात नाही आणि या प्रकरणात लगेच अर्ज न घेता गुन्हा दाखल करणे हे कितपत योग्य आहे .? आलेल्या त्या सर्व अर्जावरून गुन्हे दाखल करतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तक्रारदाराची तक्रार असताना त्यावर मार्केटयार्ड पोलिसांनी चौकशी करण्याची देखील तसदी घेतली नाही. आणि समोरच्यांनी साधी तक्रार केल्यानंतर बातमी प्रसारित करणाऱ्या पत्रकारावरच खोटा गुन्हा दाखल करून अभिव्यक्ती स्वातंत्रावर गदा आणण्याचा प्रयत्न मार्केटयार्ड पोलिसांनी केल्याचे दिसते.

या सर्व प्रकारावर केंद्रीय पत्रकार संघाने आज दि. १६ एप्रिल २०२५ रोजी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना समक्ष भेटून निषेध व्यक्त केला आहे. तर एनसी दाखल केल्यानंतर गुन्हा का दाखल करण्यात आला याबाबत आयुक्त देखील आश्चर्यचकित झाले.तर आजही मार्केटयार्ड पोलिसांकडून त्या पत्रकाराला वारंवार फोन करून त्रास दिला जात असल्याचे देखील पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास शिष्टमंडळाने आणून दिले. त्यावर पोलीस उपायुक्तांशी चर्चा करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी केंद्रीय पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

यामध्ये केंद्रीय पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष रियाज मुल्ला, हिंदी मराठी डिजिटल मिडिया महासंघाचे अध्यक्ष मुजम्मिल शेख, सजग नागरिक टाईम्सचे संपादक मजहर खान, पोलिसकाका न्यूजचे संपादक संदीप कोदरे, एसीएस न्यूजचे संपादक वाजिद एस खान, वेब न्यूज २४ चे संपादक सुधीर देशमुख, पुणे माझा न्यूजचे पत्रकार जमीर शेख, पुणे क्राईम न्यूजचे पत्रकार नागेश देडे, स्टार न्युज इंडियाचे सह संपादक जब्बार मुलाणी व इतर पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad