Kondhwa News | कोंढवा, येवलेवाडी आणि पिसोळी परिसरातील अनधिकृत प्लॉटिंगवर लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Sunday, 13 April 2025

Kondhwa News | कोंढवा, येवलेवाडी आणि पिसोळी परिसरातील अनधिकृत प्लॉटिंगवर लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे

कोंढव्याची वाटचाल कुदळवाडीच्या दिशेने होत असल्याची चर्चा कोंढवा-येवलेवाडी-पिसोळी याठिकाणी देखील होणार का कुदळवाडी सारखी कारवाई ?

 

अनधिकृत प्लॉटिंगवर कठोर कारवाई सुरु; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांची माहिती


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : कोंढवा आणि येवलेवाडी येथील अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामांबाबत ताज्या बातम्यांनुसार, पुणे महानगरपालिका आणि महसूल खात्याकडून या भागात कठोर कारवाई सुरू आहे. 25 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, कोंढवा, येवलेवाडी आणि पिसोळी परिसरातील अनधिकृत प्लॉटिंगवर लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे पुणे शहरातील कोंढवा, येवलेवाडी आणि पिसोळी परिसरातील अनधिकृत प्लॉटिंगवर कठोर कारवाई सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली. आमदार योगेश टिळेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री बावनकुळे बोलत होते.


येवलेवाडी भागात अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला असल्याचे सांगून महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, याप्रकरणी काही विकासकांना नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महानगरपालिका, पीएमआरडीए आणि महसूल विभाग एकत्र येऊन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करतील. यासाठी पुणे पोलीस आयुक्तांशी समन्वय साधून पुढील कायदेशीर पावले उचलली जातील.कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कंत्राटदाराने भ्रष्ट मार्गाने अनधिकृत प्लॉटिंग करून लोकांची फसवणूक केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात स्पष्ट केले.

 







No comments:

Post a Comment

Post Top Ad