पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : दि.२४/०४/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांचे दिमतीमध्ये गुन्हे शाखा युनिट ०५ पथका कडील पोलीस स्टाफ असे कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये गस्त करीत असताना सहायक पोलीस फौजदार राजस शेख व पोलीस हवालदार पृथ्वीराज पांडुळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन पोलीस अभिलेखावरील आरोपी नामे मौला ऊर्फ मौलाना रसुल शेख, वय.२२ वर्षे, रा. गल्ली नंबर ०२, माऊली कृपा बिल्डींग लक्ष्मीनगर कोंढवा बुा पुणे यास स.नं. ०५ अश्रफनगर कोंढवा बुगा पुणे यास ताब्यात घेवुन त्याचे कब्जात मिळुन आलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस असे एकुण २२,३००/- रु.चे अग्निशस्त्र जप्त करुन त्याचेविरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३३७/२०२५ भारतीय हत्त्यार कायदा कलम ३(२५) व मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास पुढील कार्यवाही करीता कोंढवा पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
नमुद आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील असुन त्याचेविरुध्द यापुर्वी शरीरावरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक युनिट ०६ गुन्हे शाखा, श्री. वाहीद पठाण अति कार्यभार युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर, सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले, शहाजी काळे, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, उमाकांत स्वामी, अकबर शेख, राहुल ढमढेरे, सुहास तांबेकर, प्रमोद टिळेकर, संजय दळवी, अमित कांबळे, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, शुभांगी म्हाळशेकर यांचे पथकाने केली आहे
No comments:
Post a Comment