बँक व फायनान्स कंपनीच्या विरोधात १९ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी -अहमदनगर,(वार्ताहर):- बँकांच्या जुलमी व नियमबाह्य कारवाई मुळे जनता त्रस्त होत आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून घराची जप्ती करणे त्याचा लिलाव करणे अशा प्रकारच्या नियमबाह्य कारवाईमुळे त्रस्त होऊन जनता रस्त्यावर उतरत आहे अशा कारवाई वर अनेक पत्रव्यवहार करून देखील कोणतेही दखल जात नसल्याने महाराष्ट्रात आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे याकरीता अस्पायर होम फायनान्स लि. व प्रायव्हेट बैंक, इतर फायनान्स कंपनीच्या जुलमी मनमानी कारभाराबाबत विरोधात 19 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भेंडा येथील स्थानिक नागरिक व जनता सरकार मोर्चा चे सदस्य आसिफ पठाण व सुहास वेताळ यांनी दिली.
त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य पातळीवर पुण्यात देखील 23 जानेवारी 2024 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे ''सत्याग्रह आंदोलन'' करण्यात येणार आहे
बँकेच्या मनमानी कारभाराचे बाबत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, अस्पायर होम फायनान्स लि व प्रायव्हेट बँके सह इतर फायनान्स कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, मॅनेजर, हे भारतीय रिजर्व बँकेच्या नियमांचे, तरतुदींचे उल्लंघन करून जुलमी व मनमानी कारभार करत असल्याबाबत या पुर्वी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे तक्रार देण्यात आली होती. त्या अनुषंगाने सर्व ग्राहाकांनी जिल्हा अधिकारी कार्यालय अहमदनगर येथे देखील या कंपनी व फायनान्स कंपनीच्या विरोधात वेळो वेळी तक्रारी दिलेल्या आहेत.
तरी देखील या फायनान्स कंपनी भारतीय रिजर्व बँकेच्या नियमांचे,तरतुदींचे व नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करून अवैधरित्या वसुली करत आहेत. तसेच अवैध प्रकारे लिलाव व जप्तीसाठी कार्यवाही करत आहे. त्यामुळे अशा या फायनान्स कंपनी व प्रायव्हेट बँका यांच्या गुंडगिरीमुळे त्रस्त ग्राहाकांचे जिल्हाधिकारी कार्यालय यांचे समोर विविध मागण्यासाठी शुक्रवार दि. 19 जानेवारी 2024 रोजी लोकशाही पद्धतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सुमारे 150 ते 200 लोक उपस्थित राहतील, त्यामुळे आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी ही करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment