Loan Recovery Agent । कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंट शिवीगाळ, धमकावतात का ? घाबरू नका अन् अशाप्रकारे तक्रार करा - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 15 November 2023

Loan Recovery Agent । कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंट शिवीगाळ, धमकावतात का ? घाबरू नका अन् अशाप्रकारे तक्रार करा

Complaint Against Loan Recovery Agent । बँकांना कर्जाची रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे, परंतु यासाठी त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. या अंतर्गत कर्जाचे हप्ते न भरल्यास बँकेने नियुक्त केलेल्या एजंट्सनी ग्राहकांना धमकावल्यास किंवा शिवीगाळ केल्या ग्राहक त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करू शकतात, तसेच दंडाची मागणी करू शकतात.

हायलाइट्:

  •    अनेकदा बँकेचे वसुली एजंट कर्जवसुलीच्या नावाखाली ग्राहकांशी गैरवर्तन करतात.
  •    कर्ज वसुलीबाबत आरबीआयची मार्गदर्शक तत्त्वे आहेत ज्यांचे पालन केले पाहिजे.
  •    कर्जवसुली करताना ग्राहकांना कोणत्याही प्रकारे त्रास देणे बेकायदेशीर आहे.

पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : नवी दिल्ली -  आजच्या वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्ती घर, गाडी, आणि शिक्षण यासह इतर गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेते. आयुष्यात अनिश्चितता असल्याने काही वेळा अशी परिस्थिती येते की कर्ज फेडण्यात अडचणी येतात. मात्र बँक किंवा अन्य वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे आवश्यक असून बँकेचे अधिकारी सातत्याने ग्राहकांशी संपर्क साधतात. परंतु बँकेचे वसुली एजंट कर्जवसुलीच्या नावाखाली गैरव्यवहार करतात, असे अनेकवेळा आढळून आले आहे. अशा स्थितीत कर्ज घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्याच्या हक्कांची माहिती असणे गरजेचे आहे.


बँकेच्या कर्ज वसुली एजंट तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर घाबरू नका, त्याविरोधात आवाज उठवा. देशाची केंद्रीय बँक - भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत काही कडक नियम केले असून या अंतर्गत कर्जाचे पैसे न भरल्यास बँकेने ग्राहकांना धमकावल्यास ग्राहक त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करू शकतात, तसेच तुम्ही दंडाची मागणी करू शकता.


कर्ज वसुलीची प्रक्रिया कशी असते

 
कर्जाची सलग दोन ईएमआय न भरल्यास बँक सर्वप्रथम तुम्हाला एक पूर्व सूचना (रिमाइंडर) देते. तर जर तुम्ही सलग तीन हप्ते भरू शकला नाही तर बँक तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवते. आणि इशारा देऊनही जर तुम्ही ईएमआय भरला नाही तर बँक तुमहाला डिफॉल्टर घोषित करते आणि यानंतर कर्जदारांकडून कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरु होते.

कर्ज वसुली कशी होते?

 
जेव्हा एखादा कर्जदार कर्ज फेडण्यात अपयशी होते, तेव्हा बँक त्याच्याविरूद्ध कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरू केली जाते. कर्ज वसुलीचे दोन मार्ग आहेत - पहिला गैर-न्यायिक मार्ग आणि दुसरा न्यायिक प्रक्रिया आहे. मात्र, वसुली दरम्यान RBI मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की ग्राहकांच्या कायदेशीर अधिकारांचा आणि दायित्वांचा आदर केला पाहिजे.

कर्ज वसुलीसाठी आरबीआयचे नियम


जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले आहे आणि ते फेडायला तुम्हाला अडचण होत असेल तर बँक वसुलीसाठी तुमच्याशी संपर्क साधू शकते, परंतु कोणत्याही बँक अधिकाऱ्याला किंवा वसुली एजंटला कोणत्याही ग्राहकाशी गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही. यासंदर्भात आरबीआयची मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत ते जाणून घेऊ…

  •     कर्ज वसुली एजन्सीचा तपशील ग्राहकांना अगोदर कळवळा पाहिजे.
  •     डिफॉल्टरला भेटताना एजंटला अधिकृतता पत्र आणि बँकेच्या नोटिसची एक प्रत देखील सोबत ठेवावी लागेल.
  •     कर्जदाराने तक्रार दाखल केल्यास सदर तक्रारीचे निराकरण होईपर्यंत या प्रकरणात रिकव्हरी एजंट पाठवण्याची परवानगी नाही.
  •     वसुली प्रक्रियेबाबत कर्जदारांच्या तक्रारींची योग्य दखल घेतली जाईल याचीही बँकेने खात्री करावी.
  •     ग्राहकांकडून कर्ज वसुलीसाठी काही नियम व कायदे निश्चित करण्यात आले आहेत, ते पुढीलप्रमाणे आहेत.


तक्रार कुठे करायची?


सर्वोच्च न्यायालयाने कर्ज वसुलीच्या चुकीच्या पद्धती जसे की ग्राहकाला धमकावणे आणि त्रास देणे हा गुन्हा मानला आहे. कर्जाची वसुली करताना कोणताही रिकव्हरी एजंट तुम्हाला धमकावत असेल, तर तुम्ही बँकेत तसेच पोलिस ठाण्यात तक्रार करावी. कर्जाचा हप्ता न भरणे हे दिवाणी विवादाच्या कक्षेत येते. अशा स्थितीत, बँक किंवा त्यांचे कोणतेही वसुली एजंट डिफॉल्टरशी मनमानीपणे वागू शकत नाहीत.
बँक अधिकारी किंवा वसुली एजंट फक्त सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेतच डिफॉल्टरला फोन करू शकतात आणि घरी जाऊ शकतात. जर बँकेच्या प्रतिनिधीने नियम मोडले तर तुम्ही फोन करून तक्रार करू शकता.

जर अधिक माहिती किंवा मदत हवी असेल तर आमच्याशी थेट संपर्क साधा आमचा क्रमांक - 7020873300


 

No comments:

Post a Comment

Post Top Ad