Demand to File Criminal Cases Against All Banks, NBFC Companies | पुण्यात राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, व फायनान्स कंपनीवर फौजदारी गुन्हें दाखल करण्याची मागणी - जनता सरकार मोर्चा - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Thursday, 1 February 2024

Demand to File Criminal Cases Against All Banks, NBFC Companies | पुण्यात राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, व फायनान्स कंपनीवर फौजदारी गुन्हें दाखल करण्याची मागणी - जनता सरकार मोर्चा

भारतीय रिझर्व्ह बॅकेच्या तरतुदींचे व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, व फायनान्स कंपनीवर फौजदारी गुन्हें दाखल करणेबाबत पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालय येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले


पुणे माझा न्युज - प्रतिनिधी : दिवसेंदिवस वाढती महागाई, बेरोजगारी, आत्महत्या याचे कारण म्हणजे भारताची बँकिंग व्यवस्था असल्याने अनेक लोक त्रस्त झाले आहेत कर्जाच्या जाळ्यात अडकवून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तरतुदींचे व कायद्याचे उल्लंघन करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका व फायनान्स कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका व फायनान्स कंपनीचे अधिकारी व कर्मचारी भारतीय रिझर्व्ह बॅकेच्या (आर.बी.आय.) तरतुदींचे व कायद्याचे उल्लंघन करुन "बॅक नोट" हीच वैध रुपया आहे असे भासवून भारतीय नागरिकांची व ग्राहकांची दिशाभूल व विश्वासघात करुन, फसवणूक करीत आहेत. 

 

 

तसेच कोरोना महामारीमुळे बहूसंख्य व्यक्तींचे उद्योग, व्यवसाय, नोकरी, व्यापार अडचणीत आलेले आहेत. बँकेकडून घेतलेले गृहकर्ज, उद्योग कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, वाहन कर्ज, इत्यादी स्वरुपाचे कर्जे थकल्याने हताश, हतबल व निराश झालेल्या कर्जदार व जामिनदार तसेच शेतकरी, हातगाडीवाले, व्यापारी उद्योजक इत्यादींचे बँकेमार्फत आर्थिक, शारिरीक, मानसिक शोषण व त्रास देवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याने कर्जदारांच्या हितासाठी अनेक संघटना एकवटल्याने बँकिंग व्यवस्थे बाबत प्रश्न चिन्ह निर्माण केला आहे. या आंदोलनात अनेक संघटनांनी सहभाग घेतला व कर्जदारांच्या बाजूने जे नियम बाह्य कारवाईसाठी आवाज उठवला गेला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या विविध संघटनेच्या वतीने "सत्याग्रह आंदोलन" करण्यात आले. यावेळी या आंदोलनात खालील  मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी भारतीय नागरिक व ग्राहकांना न्याय देण्यासाठी विभागीय आयुक्त यांना निवेदन देखील देण्यात आले  त्याचबरोबर बँक व ग्राहकांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ही विभागीय आयुक्त यांची राहील असेही यावेळी सांगण्यात आले खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले
 

                                                                मागण्या :-

१) भारतीय नागरिक व बँकांचे ग्राहक यांच्या हितार्थ भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आर.बी.आय.) नियमानुसार व तरतुदी नुसार एक रुपयाचे मानक मुल्य ०.७७७ ग्रॅम २४ कॅरेट सोने (0.777 Gram Gold in 24 Caret) इतके आहे असा फलक बॅकेच्या दर्शनी भागात आठ दिवसांच्या आत मोठ्या अक्षरात (मराठी, हिंदी, इंग्रजी) भाषेत लावण्यात यावा व त्याप्रमाणे बँकेने अंमल करावा.

२) राष्ट्रीय बॅक, सहकारी बँक, फायनान्स कंपनी यांनी भारतीय नागरिक व ग्राहकांसोबत रुपयाची देवाण घेवाण कोणत्या वैध रुपयाच्या चलनात केलेली आहे याची माहिती द्यावी आणि त्या वैध रुपयाच्या चलनाचा तपशिल स्पष्ट करावा. तसेच वैध असलेल्या रुपयाचे रुप, रंग, स्वरुप वास्तवात कसे दिसते याचे व्हिडीओ चित्रीकरण करुन द्यावे.

३) राष्ट्रीय बॅक, सहकारी बँक, फायनान्स कंपनी यांनी भारतीय नागरिकांना व ग्राहकांना कर्ज वितरित केल्यानंतर सदर कर्जास द.सा.द.शे. प्रमाणे किंवा दरमहा याप्रमाणे व्याज आकारणी करीत असते. त्यामुळे व्याज म्हणजे काय? व्याजाची उत्पत्ती / निर्मिती कशी होते ? भारतीय नागरिकांनी बँकेला "व्याज" अदा करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने वेगळे रुपये छापले आहेत का? तसेच मुद्दल रकमेमध्ये व्याज मिसळून मुद्दलाचे आकडे (अंक) अभासी निर्माण केलेले आहे किंवा कसे? याबाबतची माहिती बँकेत असलेल्या नागरिकांना व ग्राहकांना कळावी याकरिता बॅकेच्या दर्शनी भागामध्ये सदर माहितीबाबत फलक लिहिण्यात यावा व याबाबतची माहिती आम्हाला मिळावी. ४) बँक कर्ज प्रकरणात मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत दिलेल्या आदेशान्वये मालमत्ता जप्ती संदर्भात होत असलेल्या प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात त्वरीत थांबविण्यात यावी.


 
५) भारतीय रिझर्व्ह बॅकेच्या तरतुदींचे व कायद्याचे उल्लंघन करुन, ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राष्ट्रीय बँका, सहकारी बँका, फायनान्स कंपनी यांचे सहसंबंधित अधिकारी, कर्मचारी यांचेवर भारतीय दंड संहिता आय.पी. सी. कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७७अ, १२०ब, ३४/४८९ब, ४८९क इतर कलमान्वये व अन्य योग्य त्या कायद्यातर्गत फौजदारी गुन्हें दाखल करावेत. तसेच या बॅका सील करण्यात येवून कायद्याचे पालन करणाऱ्या ग्राहकांना व भारतीय नागरिकांना न्याय मिळावा 

या मागण्या निवेदनात देण्यात आल्या या वेळी जनता सरकार मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य डॉ देवेंद्र बल्हाराजी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्यचे कार्यकारणी सदस्य रियाज मुल्ला, आनंद भाई, गुरमीत सिंग मल्ही, गुणिश गर्ग, निकुंज जोशी, मंगल देंडगे, पक्षकार संघचे महाराष्ट्र सचिव बसवराज येरनाळे, रिक्षा पंचायत समितीचे अध्यक्ष अशोक मिरगे, भ्रष्ट्राचार विरोधी जनआंदोलन चे अध्यक्ष काशिनाथ शेलार, युथ विंग चे अध्यक्ष सुलतान शाह, व इतर उपस्थित होते


जनतेने बँकेच्या मनमानी व जुलमी कारवाईला न घाबरता जनता सरकार मोर्चा शी संपर्क साधण्याचे केले आव्हान - 7020873300

No comments:

Post a Comment

Post Top Ad