राष्ट्रीय आर्म बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : लखनौ उत्तर प्रदेश येथे 21 ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय आर्म बॉक्सिंग स्पर्धेत संपूर्ण भारतातील सुमारे 12 राज्यांतील 400 खेळाडूंनी भाग घेतला, ज्यामध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ.जम्मू आणि काश्मीर, बिहार इत्यादी राज्यांनी सहभाग दर्शविला तसेच आर्म बॉक्सिंगला यूपी ऑलंपिक असोसिएशनची मान्यता देखील आहे.
ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत उत्तर प्रदेशला प्रथम क्रमांक तर महाराष्ट्राला द्वितीय क्रमांक तसेच केरळला तृतीय क्रमांक मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन आर्म बॉक्सिंग इंडियाचे सरचिटणीस नसीरुद्दीन, अवध विद्यापीठ क्रीडा परिषदेचे सहसचिव डॉ.राम मनोहर लोहिया, प्राध्यापक अनु डीजी आणि लखनौ इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या प्राचार्य मांडवी त्रिपाठी यांच्या हस्ते झाले.याशिवाय रेणू यादव, प्राचार्य बी.आर. डी. इंटर कॉलेज रायबरेली, रोहित बाजपेयी लेखा कोषागार विभागाचे प्रमुख उपस्थित होते समापन मिस यू पीओ रोशनी आलम, एथलीट जिम के मालिक उत्तम सिंह थापा, सेवानिवृत्त एस. जी. एक्स कमोडो महेंद्र कुमार सिंह आणि पुन: राजकोटि याच्या हस्ते करण्यात आले
या स्पर्धेत (महाराष्ट्र) आर्म बॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा ठसा उमटवला. महाराष्ट्र संघामधून राज्य संघटनेचे सुरेश कोळी,उमर अन्सारी फाईट ऑफ लाईफ अकॅडमी महाराष्ट्र संघ ने 20 सुवर्ण,15 रोप्या, 8 कास्य असे एकूण 43 पदक पटकावले. महाराष्ट्र आर्म बॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष इरफान शेख यांना 1 डॅन या पदकाने सन्मानित करण्यात आले
विजय खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे:
मुले : सुवर्ण पदक पटकवणारे : शाबान खान, श्रेयस सावत,साद इनामदार, रितेश मोरे , संघर्ष कोळी, उमैर अन्सारी, शुभम विश्वकर्मा, नोमन शेख, देव तिवारी, मुजाहिद शेख, विराज पवार, जैन सय्यद,रेहान शेख,अर्हम खान ,खालिद मोमीन,मोहम्मद शेख
रौप्य पदक पटकवणारे : सार्थक ढगे, शोएब शेख, हदी शेख, हर्षद गायकवाड, सिध्दांत बडेर्गे, सुदर्शन कोळी, अब्दुल बागवान असद अन्सारी,आर्यन होळकर,सरफराज तांबोळी
कास्य पदक पटकवणारे : शौर्य मोठे, उसमा नदिमुळक, इस्माईल वोघडे, शादमान शेख, सरिम शेख, हम्मद चोधरी
मुली - सुवर्ण पदक पटकवणारे : सई भाटले,संस्कृती कुंभारडे, अमरा शाह, अल्फिया वतनदार, कुल्सुम मनियार
रौप्य पदक पटकवणारे : सिद्रा शेख, आलिया शेख, अकिफा शेख, आइरा अलुरे या सर्व खेळाडूंचे विविध माध्यमांच्या वतीने राज्यस्तरीय कौतुक केले जात आहे
तसेच शेर ए हिंद फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अजहर खान यांनी मुलांना भेटून भावी वाटचालीस प्रेरणा देऊन शुभेच्छा दिल्या
No comments:
Post a Comment