कोंढवा परिसरात अनधिकृत विनापरवाना बांधकामाचा सुळसुळाट लावणाऱ्या बिल्डरांवर पालिकेची कारवाई
अनधिकृत गौण खनिज उत्खनन करून पुणे जिल्हाधिकारी यांचे महसूल (रॉयल्टी) बुडविला गेल्याने पुढील कारवाई साठी तलाठी कार्यालयाशी करणार पाठपुरावा
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुणे शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम होत असल्याने पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे पुण्यातील कोंढवा भागात असंख्य बांधकाम हे अनधिकृत असून या ठिकाणी अरुंद रस्ते, गल्ली, बोळ असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करून अवैध रित्या, जीवघेणे बांधकाम सुरु आहेत स्वतःला बिल्डर म्हणणाऱ्या तथाकथित बिल्डर यांनी अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरु लावला होता.
कोणतेही परवानगी व नियमाचे पालन न करता पालिकेचा महसूल बुडवून शासनाची फसवणूक करून बांधकाम सुरूच होते पालिकेने कोंढव्यातील मिठा नगर, भाग्योदय नगर येथील माजी नगरसेवक यांच्या कार्यालय समोर सुरु असलेले माने बिल्डरवर कारवाई करत अनेक ठिकाणचे बांधकामावर हातोडा मारला आहे.

हे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे असून लोकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार हे बिल्डर करत असताना एकीकडे बिल्डिंग बांधताना ज्या काही अटी शर्ती किंवा नियम आहेत ते डावलून स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार हे बिल्डर करत आहेत.
कोंढवा परिसर हा बहुसंख्य मुस्लिम समाज असलेला हा भाग आहे या भागात अनेक ठिकाणी गुंठेवारीत काम करत असताना स्वतःच्या लालसेपोटी कोणतेही नियम वा अति शर्तीचे पालन न करता बांधकामाचा तगादा सुरु होता बऱ्याच बिल्डिंगला पालिके कडून कोणतेही परवानगी घेण्यात आली नव्हती म्हणून हि कारवाई करण्यात आल्याचे पालिकेचे कनिष्ठ अभियंता विक्रम क्षिरसागर यांनी सांगितले.

परंतु अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरु असताना शासनाचा महसूल बुडवून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे या सर्व गोष्टींचा पाठपुरावा आमच्या पुणे माझाच्या प्रतिनिधीने केल्या नंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.
भविष्यात अशा अनधिकृत बांधकामावर पालिका कोणत्याही प्रकारे तडजोड करणार नसल्याचे सांगितले जात आहे तरी देखील या ठिकाणचे बिल्डर पालिकेला न जुमानता तलाठी यांना पाकीट देऊन काही गाव गुंडाना आपल्या हाताशी धरून हे बांधकाम करताना दिसत आहेत.
सदरची कारवाई शहर अभियंता यांचे आदेशानुसार झोन क्रं. २ चे कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांच्या मार्गदशना खाली उप अभियंता राजेश खाडे ,कनिष्ठ अभियंता विक्रम क्षिरसागर, सुनील राठोड व अमोल पुंडे यांनी पार पडली यामध्ये एकूण ५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून अंदाजे 10000 चौ फूट पेक्षा जास्त एरिया वर कारवाई करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment