Pune Crime News | कोंढवा पोलीस ऍक्शन मोडवर; २ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे बाळगणारा गजाआड - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Saturday, 4 November 2023

Pune Crime News | कोंढवा पोलीस ऍक्शन मोडवर; २ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे बाळगणारा गजाआड

 कोंढवा पोलीस ऍक्शन मोडवर; २ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे बाळगणारा गजाआड 


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : कोंढवा परिसरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेत कोंढवा पोलिसांनी गुन्हेगारांच्या विरुद्ध कंबर कसली असून गुन्हेगारांची कसलीही हयगय केली जाणार नसल्याचे सांगितले जात आहे कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरी व घरफोडी चोरीस प्रतिबंध करणेकामी पेट्रोलिंग करुन प्रतिबंध करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी सपोनि दिनेश पाटील, पोहवा. विशाल मेमाणे, पोहवा. सतिश चव्हाण, पोहवा निलेश देसाई, पोहवा लवेश शिंदे, पो.ना. जोतिबा पवार, पो. अमंलदार लक्ष्मण होळकर, पो. अमंलदार संतोष बनसुडे, पो. अमंलदार सागर भोसले, पो. अमंलदार सुजित मदन असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार विशाल मेमाणे यास विश्वसनीय खब-याकडुन बातमी मिळाली की, एक मुलगा रंगाने काळा सावळा, अगांत लाल कलरचा शर्ट त्यावर काळया लाईन, निळया रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला इसम हा येवलेवाडी खडीमशीन पोलीस चौकी जवळील श्रीराम चौक ते इस्कॉन टेम्पलकडे जाणारे रोडला फुटपाथवर थांबलेला असुन त्याच्या हालचाली ह्या सशयास्पद आहे. त्याच्या कमरेला पिस्टल सारखे हत्यार लावल्या सारखे दिसत आहे. 

सदर भागात तो कोणाची तरी वाट पाहत आहे. तेव्हा आम्ही वरिल स्टाफसह कान्हा हॉटेल चौकात जावुन थांबलो. तेथे दोन पंचाना बोलावुन सोबत घेवुन श्रीराम चौक ते इस्कॉन टेम्पलकडे जावुन मिळालेल्या बातमीच्या वर्णनाच्या इसमाचा शोध घेत असता सदर इमस हा संशयीतरित्या थांबलेला दिसुन आला. आम्ही त्याचेकडे बघितले असता तो आम्हाला पाहुन पळुन जावु लागला. त्यावेळी आम्ही आमचे स्टाफचे मदतीने सदर इसमास १९/२५ वा सुमारास पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने तुळशीराम शहाजी उगडे, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं ९ पाण्याच्या टाकी मागे, टिळेकरनगर, पुणे मुळ रा. लांडवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतले. त्यावेळी त्याचे झडती घेतली असता त्याचे शर्टच्या पाठीमागे दोन्ही बाजुस काहीतरी लावलेले दिसून आले त्याची तपासणी केले असता त्याचे कबंरेला एक पिस्टल व एक गावठी कट्टा खोचलेल्या अवस्थेत दिसला. तसेच जिन्स पॅन्टच्या उजव्या बाजुकडील खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत २ जिवंत काडतुसे मिळाले तसेच पिस्टलच्या मॅग्झीनमध्ये २ जिवंत काडतुसे त्याच्याकडे मिळुन आले आहे. त्याच्याकडे परवाना आहे ? अगर कसे याबाबत चौकशी केली असता त्याने सदर अग्नीशस्त्र परवाना त्याच्याकडे नसल्याचे सांगीतले म्हणुन त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अश्याप्रकारे वरील आरोपी याच्याकडुन ५५,०००/- रु कि दोन पिस्टल व ४००/- रु कि ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

सदर इसमाच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ११२२ / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर व सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, दिनेश पाटील, सहा. पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त सो., श्री संदिप कर्णिक, श्री रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त सो., पूर्व प्रादेशिक विभाग, श्री विक्रांत देशमुख, मा.पोलीस उप-आयुक्त सो., परिमंडळ-५, श्री शाहूराजे साळवे, मा. सहा. पोलीस आयुक्त सो., वानवडी विभाग श्री संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो., कोंढवा पोलीस स्टेशन, श्री संदीप भोसले, मा. पोलीस निरीक्षक साो., गुन्हे श्री संजय मोगले, मा. पोलीस निरीक्षक सो., गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस हवालदार / ६९५१ विशाल मेमाणे, पोलीस हवालदार / ११६१ सतिश चव्हाण, पोलीस हवालदार / ७९ निलेश देसाई, पोलीस हवालदार / १४२२ लवेश शिंदे, पोलीस नाईक / ७७८२ जोतिबा पवार, पोलीस अंमलदार / ८५९१ लक्ष्मण होळकर, पोलीस अंमलदार / ९८३८ संतोष बनसुडे, पोलीस अंमलदार / २१८५ सुजित मदन, पोलीस अंमलदार / १०११६ ज्ञानेश्वर भोसले, पोलीस अंमलदार / ८२९८ अभिजीत रत्नपारखी यांच्या पथकाने केली आहे

No comments:

Post a Comment

Post Top Ad