Crime News - Vishrantwadi Pune | काळा बुरखा घालून गुन्हे करणाऱ्या आरोपीस विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Thursday, 9 November 2023

Crime News - Vishrantwadi Pune | काळा बुरखा घालून गुन्हे करणाऱ्या आरोपीस विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात

काळा बुरखा घालून गुन्हे करणाऱ्या आरोपीस विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी :
दि. ०२/१५/२०२३ रोजी दुपारी १२.३० चे सुमारास रश्मी हायस्कुल आदर्श इंदिरा नगरच्या शाळे समोर एक अनोळखी व्यक्तीने या बुरखा घालून लहान मुलांचे अपहरणाचा प्रयत्न केलेचे प्राप्त तक्रारी वरून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर ३२६/२०२३ भा.द.वि. कलम ३६३, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलाचे अपहरणाचा प्रयत्न असल्याने गुन्ह्याचा तपास गांभीर्याने संवेदनशिलतेने घेवून दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेणे कमी तपास पथकास आदेशीत केल्याने पोउन सातपुते यांनी पोलीस अंमलदार शेखर खराडे प्रफुल्ल मोरे यांची एक टिम तयार करून येरवडा भागात पाठवले दरम्यान टिमला त्यांचे बातमीदारांमार्फत गोपनीय माहिती मिळाली की, रश्मी  इंग्लिश स्कूल येथील लहान मुलाचे अपहरण करण्याच्या गुन्ह्यातील इसम हा वाघेरी वस्ती कामराज नगर येरवडा येथे राज चौकात संतोष मेडिकल समोर उभा आहे 


सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून इसम नामे विजय अमृत वाघरी वय वर्षे २३, रा. वाघेरी वस्ती, कामराज नगर, येरवडा पुणे यास ताब्यात घेतले विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे घेऊन आल्यावर त्याच्याकडे तपास केले असता आरोपी इसम हा रश्मी हायस्कुल या शाळे मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीस भेटण्यासाठी शाळेजवळ आला होता गेल्या काही दिवसांपासून तो अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता सदर आरोपीने मुलीचा  पाठलाग करणे, इशारा करणे असा गुन्हा केला असल्याचे व त्यासाठी बुरखा घालून रश्मी हायस्कुल जवळ आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दाखल गुन्ह्यात भादवि कलम ३५४(ड) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ वाढ करण्यात आले असून आरोपीस अटक करून  न्यायालयात हजर करण्यात आले मा. न्यायालायने त्याची येरवडा कारागृहामध्ये रवानगी केली आहे.

सदरची कारवाई मा. रंजनकुमार शर्मा, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मा शशिकांत बोराटे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, मा. आरती बनसोडे सहा.पोलीस आयुक्त खडकी विभाग, मा. वपोनि दत्तात्रय भापकर व पोनि गुन्हे भालचंद्र ढवळे यांचे मार्गदर्शनाखाली सदरची उलेखनीय कामगिरी ही तपास पथकाचे अधिकारी पोलिस, पोउनि लहू सातपुते, पोउनि शुभांगी मगदुम, पोउनि गेंड तसेच अमंलदार पोलीस हवालदार दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, पोना संपत भोसले, संजय बादरे,  पोशि. संदीप देवकाते, प्रफुल मोरे, शेखर खराडे यांचे पथकाने उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली

No comments:

Post a Comment

Post Top Ad