कोंढव्यात सुरु आहे अनधिकृत गौण खनिज करून विनापरवाना बांधकामाचा सुळसुळाट
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : कोंढवा परिसर हा बहुसंख्य मुस्लिम समाज असलेला हा भाग आहे या ठिकाणी अरुंद रस्ते, गल्ली, बोळ असल्याने याठिकाणी तथाकथित बिल्डर यांनी अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरु केला आहे कोणतेही परवानगी न घेता पालिकेचा महसूल बुडवत शासनाची फसवणूक करून बांधकाम सुरूच आहेत असाच एक प्रकार कोंढव्यातील भाग्योदय नगर येथील माजी नगरसेवक यांच्या कार्यालय समोर अनधिकृत गौण खनिज करून अनधिकृतपणे बांधकाम केले आहे
हे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे असून लोकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार हे बिल्डर करत आहेत बिल्डिंग बांधताना ज्या काही अटी शर्ती किंवा नियम आहेत ते डावलून स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचे जीव हे बिल्डर धोक्यात घालत आहेत
या बिल्डिंगला पालिके कडून कोणतेही परवानगी घेण्यात अली नसून हाजरा पॅलेस,चे (बिल्डर माने) चे विरोधात अँटी करप्शन स्कॉडचे अध्यक्ष वाजिद एस खान पालिकेला लेखी पत्र देऊन तत्काळ सदरील बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पाडून कारवाईची मागणी केली आहे
कोंढव्यात अनधिकृत गौण खनिज करून अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार समोर येत आहे. अनधिकृत गौण खनिज उत्खनन करून पुणे जिल्हाधिकारी यांचे महसूल (रॉयल्टी) बुडविला जात आहे.तर अनधिकृतपणे बांधकाम करून पुणे महानगर पालिकेचा महसूल बुडविला जात आहे. असाच महसूल बुडविण्याचा प्रयत्न कोंढव्यातील हाजरा पॅलेसच्या बिल्डर ने केला आहे
हे बांधकाम सर्वे नंबर ५५/ भाग्योदय नगर,(लबैक मेडिकल शेजारी ) व माजी नगरसेवक यांचे ऑफिसचे समोर हाजरा पॅलेस,चे (बिल्डर माने) भाग्योदय नगर, येथे अनधिकृत गौण खनिज करून त्यावर पुणे महानगर पालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले असून, अनधिकृतपणे बांधकाम करून शासनाचा महसूल बुडविला तर जात आहे.
परंतु अनधिकृत बांधकामे करून पुणे जिल्हाधिकारी, व पुणे महानगर पालिका आयुक्त आणि शहर अभियंताना लेखी पत्र देऊन तत्काळ सदरील बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पाडण्यात यावे व रॉयल्टी बुडविला म्हणून गुन्हे दाखल करण्याची मागणी वाजिद एस खान केली आहे
No comments:
Post a Comment