पुणे माझा न्युज : प्रतिनिधी - आजकाल वाढती गुन्हेगारी पोलिसांसमोर मोठे आव्हान असताना येरवडा पोलिसांनी यावर आपली जबाबदारी पार पाडत जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ३१/०८/२०२३ रोजी गुंजन चौक येथे २२/०० याचे सुमारास फिर्यादी हे बस स्टॉपवर थांबले असताना असताना मोटार सायकल वरून दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचा मोबाईल व खिशातील १२००/- रु जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेले आहे म्हणून येरवडा पो. स्टे, गु. र. नं. ६०३ / २०२३ भादवि ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकाचे पोलीस अमलदार अमजद शेख व अनिल शिंदे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे विश्रांतवाडी भागात येणार आहे. सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व पोलीस अंमलदार अमजद शेख, अनिल शिंदे, किरण घुटे, सागर जगदाळ यांनी तेथे जावून संशयीत इसमाला पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले. त्यास त्याचे नाव पत्ता: विचारता १. सोमेश सुभाष कुसाळे वय २५ वर्षे रा टिंगरेनगर पुणे २. संतोष गरिबदास खंडागळे वय ३१ वर्षे रा महाराष्ट्र हौसिंग सोसा. येरवडा पुणे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी चोरी केल्याचे कबूल करून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीस दि. १३/०९/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेला २,०००/- किंमतीचा मोबाईल व गुन्हयात वापरलेली ४०,०००/- रु किमतीची मोटारसायकल असा एकूण ४२,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक अंकुश डोंबाळे करत आहेत.
सदरची कामगिरी श्री शशिकांत बोराटे साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ श्री संजय पाटील सो सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, श्रीमती कांचन जाधव, पोनि गुन्हे, श्री जयदिप गायकवाड, पोनि गुन्हे येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोबाळे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment