शहराचे मुख्य रस्त्यावरुन पहाटेच्या वेळी प्रवास करणा-या कारचालकाचा मोबाइल व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावणारी टोळी २४ तासांचे आत खडक पोलीसांकडुन गजाआड
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथे राहणारा व मित्राचे आईवडीलांना घेण्यासाठी चाललेल्या कारचालक तरुणास चार जणांचे टोळक्याने लुटल्याची घटना नुकतीच पुणे शहरातील शंकरशेठ रोड या मुख्य रस्त्यावर घडली. अधिक माहिती अशी की, दिनांक १४/०९/२०२३ रोजी पहाटे ०२/३० वाजण्याचे सुमारास शंकरशेठ रोड, सेव्हन लव चौक जवळील मुख्य रस्त्यावर इसम नामे अब्दुल आहद हकीम खान वय २७ वर्षे रा. २२५/०२/०४ सुमेरा गार्डन, सईदा कॉलनी जटवाला रोड, छत्रपती संभाजीनगर हे मित्राच्या आईवडीलांना घेण्यासाठी , त्यांची इटिओस कार ने जात असताना ऑटो रिक्षास पाठीमागुन धडकल्याने सदरवेळी रिक्षा चालक व फिर्यादी यांच्यात वाद चालू झाले. त्यावेळी सदरठिकाणी एका दुचाकी मोपेड गाडीवरुन तिन अनोळखी आले. रिक्षा चालक व दुचाकी मोपेड गाडीवरुन आलेल्या तिन अनोळखी इसम यांनी आपसांत संगनमत करुन तिन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना धाकदपटशा दाखवून, झटापट करुन फिर्यादी यांचे खिशातील रोख रक्कम २०,०००/- व १५,०००/रु किंमतीचा ओपो कंपनीचा मोबाइल हॅण्डसेट व कारची चावी असा ऐवज जबरदस्तीने चोरी करून ते सर्व सदर ठिकाणाहून पळुन गेले. घडल्या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिलेल्या तक्रारीवरुन खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ३०७/२०२३ भा.द.वि.क. ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
घडलेला गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने त्याचा तपास करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी श्री. सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ सहायक पोलीस निरिक्षक राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार यांचे तपास पथक नेमण्यात आले. फिर्यादी यांचेकडे अधिक सखोल चौकशी करुन केलेल्या तांत्रिक तपासाच्या आधारे नमुद गुन्हयातील आरोपी रिक्षाचालक नामे रविंद्र मधुकर ढावरे वय ४५ वर्षे, यास शिवाजी आखाडा, जुना बाजार, २२६ / मंगळवार पेठ, काची मळा येथून ताब्यात घेवुन नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. त्याचेकडे इतर तिन अनोळखी इसमांबाबत चौकशी केली असता त्यास त्यांचेबाबत कोणतीही माहीती नसल्याचे सांगितले.
उर्वरीत तिन अनोळखी आरोपींचा शोध घेण्यासाठी शंकरशेठ रोड, सेव्हन लय चौक, नेहरू रोड या परिसरातील जवळपास ४० ते ५० सी.सी.टि.व्हि. कॅमेरांची पाहणी केली असता सदर तिन आरोपी हे स्थानिक असल्याची खात्री झाली. त्यानंतर तपास पथकातील अंमलदार संदीप तळेकर, सागर घाडगे यांना त्यांचे बातमीदारांमार्फत सदर तिन अनोळखी इसम हे भिमाले संकुल येथील पार्कींग येथे आले असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी स्टाफसह जावुन सापळा रचुन इसम नामे १) प्रथमेश उर्फ पत्या प्रमोद कांबळे, वय २३ वर्षे, रा. म्हसोबा मंदिर जवळ, कासेवाडी पुणे २) विशाल शंकर कसब, वय २३ वर्षे, रा. कासेवाडी पोलीस चौकी जवळ, कासेवाडी पुणे ३) सुशिल राजु मोरे वय २० वर्षे, रा. १० नंबर कॉलनी, कासेवाडी पुणे यांना ताब्यात घेवुन गुन्हयात अटक करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडुन गुन्हयात जबरी चोरी करुन नेलेला १५,०००/ रु किमतीचा ओपो कंपनीचा मोबाइल हॅण्डसेट व ५०००/रु रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच गुन्हा करताना वापरलेली होंडा डिओ दुचाकी क्रमांक एम.एच.१२. टि.क्यु. ७९०५ य बजाज ऑटो रिक्षा क्रमांक एम.एच.१२. एस. के. १९८३ ही वाहने तपासकामी जप्त करण्यात आली. पुढिल तपास सहायक पोलीस निरिक्षक, श्री. हणुमंत काळे हे करीत आहेत.
सदर कारवाई श्री. रितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री. अशोक धुमाळ सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री. सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संपतराव राउत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक अधिकारी श्री. राकेश जाधव सहायक पोलीस निरीक्षक, स.पो.नि. श्री. हणुमंत काळे तसेच पोलीस अंमलदार अजीज बेग, संदिप तळेकर, सागर घाडगे, मंगेश गायकवाड, रफिक नदाफ, सागर कुडले, अक्षयकुमार बाबळे, विशाल जाधव, लखन ढावरे, योगेश चंदेल यांचे पथकाने केली आहे.
No comments:
Post a Comment