तडीपार असताना पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांच्या तपास पथकाने ठोकल्या बेड्या
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी - समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व पोलीस अमंलदार समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार, रहीम शेख व हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक संशयीत इसम हा मनुशहा मस्जिद जवळ, रास्ता पेठ, पुणे येथे थांबलेला असून त्याचेजवळ मोठी भरलेली गोणी असुन त्यामध्ये काहीतरी वस्तु आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली..
सदर बातमीचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टाफ यांचेसह सदर ठिकाणी गेले असता सदरचा संशयीत इसम दिसून आला. पोलीसांना पाहुन तो इसम त्याचेजवळ असणारी गोणी जागेवरच टाकुन पळुन जात असताना, त्याचा पाठलाग करुन पकडले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता असता, त्याने त्याचे नाव सुमित फ्रँकी हॉल, वय ३०, रा. १७१, सोलापुर बाजार, कॅम्प, पुणे असे सांगितले. तसेच त्याचेजवळ असलेल्या गोणीबद्दल त्याचेकडे अधिक चौकशी केली असता, सदरचे साहित्य हे त्याने रेडचिल्ली हॉटेलच्या शेजारी असणारे बंद भंगारच्या गोडाऊन मधुन चोरले असल्याचे सांगितले. सदर बाबत पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासला असता समर्थ पोलीस स्टेशन गुरक्र. १९१/२०२३, भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० मधील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हाच असल्याची खात्री झाली.
सदर आरोपीचा पोलीस रेकॉर्ड पडताळला असता, सुमित फ्रँकी हॉल हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर विविध प्रकारचे एकूण १४ गुन्हे दाखल असुन, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ – ०२, पुणे शहर यांच्या कडुन हद्दपार आदेश क्रमांक २१/२०२३ नूसार पोलीस आयुक्तालय, पुणे शहर व संपुर्ण पुणे जिल्हा हद्दीतून तडीपार केलेले आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, श्री. प्रविण कुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०१, पुणे, श्री. संदीप गिल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे, श्री. अशोक धुमाळ, समर्थ पो स्टे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शना नुसार पोलीस उप-निरीक्षक सुनिल रणदिवे, सौरभ थोरवे, सहा. पो. फौज. दत्तात्रय भोसले, पोलीस अंमलदार, रहीम शेख, हेमंत पेरणे, रोहीदास वाघेरे, सोमनाथ धगे, जितेंद्र पवार, प्रमोद जगताप, गणेश वायकर, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी व शरद घोरपडे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment