AU Small Finance Bank Crime | कर्जाची वसुली करण्यासाठी घरी गेलेल्या बँक कर्मचाऱ्यांची अश्लील शिवीगाळ; ए यू स्मॉल फायनान्स बँकेच्या लष्कर शाखेतील सात जणांविरोधात गुन्हा दाखल - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 30 August 2023

AU Small Finance Bank Crime | कर्जाची वसुली करण्यासाठी घरी गेलेल्या बँक कर्मचाऱ्यांची अश्लील शिवीगाळ; ए यू स्मॉल फायनान्स बँकेच्या लष्कर शाखेतील सात जणांविरोधात गुन्हा दाखल

हडपसर भेकराईनगर येथील परिसरात कर्जदार महिलेच्या घरी वसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्यांची अश्लील शिवीगाळ करत दहशत

 
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी - कर्जदार महिलेच्या घरी वसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्यांची अश्लील शिवीगाळ करत दहशत.खासगी वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्यांनी एका महिलेसह कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करून धमकी देण्याचा प्रकार हडपसर भेकराईनगर येथे घडला असून हडपसर पोलिसांनी बँक कर्मचारी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे


कर्जाच्या थकलेल्या हप्त्यांची वसुली करण्यासाठी कर्जदार महिलेच्या घरी गेलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून राडा घातला. त्या कर्मचाऱ्यांनी घरातील महिलांशी असभ्य वर्तन करून त्यांचा विनयभंग केला आणि त्यांना धमकावले. हा प्रकार आठ ऑगस्टला हडपसर येथील भेकराईनगर परिसरात घडला आहे. या प्रकरणी एका ४८ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, ए यू स्मॉल फायनान्स बँकेच्या लष्कर शाखेतील अधिकाऱ्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने ए.यू.स्मॉल फायनान्स बँकेच्या लष्कर शाखेतून कर्ज घेतले होते़ त्या कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेचा अधिकारी सुशील याने कर्मचाऱ्यांना महिलेच्या घरी पाठविले. मद्यधुंद अवस्थेतील या कर्मचाऱ्यांनी या महिलेला; तसेच घरातील महिलांना शिवीगाळ केली. आरोपी महिलेच्या पतीच्या अंगावर धावून गेले. त्या वेळी महिलेने मध्यस्थीचा प्रयत्न केला असता, एका आरोपीने महिलेचा हात पकडून विनयभंग केला.वसुलीसाठी गेलेला बँकेचा एक कर्मचारी तक्रारदार महिलेच्या घरी सकाळी ९.३० वाजता गेला होता. तो दिवसभर त्यांच्या घरी ठाण मांडून बसला होता. रात्रीच्या वेळी त्याने आणखी सहा जणांना तक्रारदाराच्या घरी बोलावून घेतले. त्यामुळे एका वेळी सात जण घरात बसून कर्जाच्या हप्त्यांसाठी दबाव टाकत होते. त्यामुळे तक्रारदाराच्या घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. घडलेल्या प्रकाराचा कुटुंबीयांना मानसिक त्रास झाल्याचे तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले.स्तनपान करणाऱ्या महिलेचाही विनयभंग:बँकेचे कर्मचारी तक्रारदाराच्या घरात बसले असताना तक्रारदार महिलेची सून तिच्या बाळाला स्तनपान करीत होती. आरोपींनी एकाने तिच्याकडे पाहून, ‘कशाला याच्यासोबत लग्न केले. हे कर्जाचे दोन हप्ते फेडू शकत नाही. तुझ्या बापाला बोलावून घे,’ असे बोलून महिलेच्या सुनेचाही विनयभंग केला.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तृप्ती खळदे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Top Ad