Pune Crime News | कोंढवा पोलिसांची मोठी कामगिरी ..! पुणे शहरात घरफोडया चोरी करणा-या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Saturday, 1 July 2023

Pune Crime News | कोंढवा पोलिसांची मोठी कामगिरी ..! पुणे शहरात घरफोडया चोरी करणा-या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश

पुणे शहरातील कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत घरफोडया चोरी करणा-या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.


पुणे माझा न्यूज । प्रतिनिधी : पुणे शहरातील कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत घरफोडया चोरी करणा-या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोंढवा पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलिस अंमलदार पो हवा. २८३ अमोल हिरवे, पो. शि. ८४४२ गणेश चिंचकर, पो. शि. ८२९८ अभिजीत रत्नपारखी, पो. शि. १०११४ सुहास मोरे, पो.शि.१००२६ राहुल थोरात, पो.शि.९१२६ विकास मरगळे, पो. शि. १००७५ राहुल रासगे, पो.ना.६९४६ राहुल वंजारी असे यांना गुप्त बातमीदारा मार्फत तसेच कोंढवा पोलिस ठाणेच्या लगत पुणे ग्रामीण हद्दीतुन येणारी वाहने रात्रगस्ती दरम्यान चेक करुन शोध घेत असताना २१.०६.२०२३ रोजी खडी मशिन चौक परिसरात पोलिस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, परराज्यातुन येवून पुण्यात घरफोडया व चोरी करणारी टोळी ही सासवड भागातील चांभळी गावात राहण्यास आहे. 

सदर टोळीचा प्रमुख आरोपी सुरेंद्र असलारामजी चौधरी (वय २८ वर्षे, रा. मु. पो सौजाद ता. मारवाडी, जक्शन, जिल्हा झालोर) हा त्याच्या साथीदारासह मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी चोरी करण्यासाठी बाहेर पडत असतात. त्यांनी कोंढवा भागातही स्विप्ट कार चोरी करुन घरफोडी चोरी केलेली असून तो सांयकाळी कान्हा हॉटेल चौकात अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. १२ यु. क्यु ४४५६ हीच्यावरुन कोणाला तरी भेटण्यासाठी येणार आहे. त्याने पांढरा शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेले आहे. सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने वरिल स्टाफच्या मदतीने कान्हा हॉटेल चौकात सापळा रचला.

सायंकाळी १९.३० वा सुमारास सुरेंद्र असलारामजी चौधरी, हा वरिल मो. सा. वरुन आला व गाडी पार्क करून थांबला असताना बातमीदाराने त्याच्या दिशेने निर्देश करुन दाखविले. सदर व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या जवळ जात असताना तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता, त्यास पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे तपास करता त्याने दाखल गुन्हयातील घटनास्थळ
१ ) अजमेरा पार्क लेन नंबर नम्रा मस्जिद शेजारी, कोंढवा येथुन घरफोडी चोरी केल्याचे
२) प्रथम प्रेस्टिज कॉम्प्लेक्स शॉप नं. ०६ उंड्री पुणे येथील नवहिंद ड्रायक्लिनर्स लॉड्री दुकाना समोरिल मोकळया जागेमधुन ग्रे रंगाची इको कार क्रं. एम. एच. १२ एन. यु. ३३७,
३) भोसरी भागातील मोशी चौकाच्या अलीकडे असणा-या पाटसकर हॉस्पीटल बिल्डींग समोर पार्क केलेली बोलेरो पिकअप क्रं. एम.एच.१२ के.पी. ४५४४
४) मंचर याठिकाणी चांडोली खुा गावातील नाथ ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान
५) लोणीकंद भागातील तुळापुर रोडचे गुरुकृपा ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान
६) लोणीकंद भागातील ए. पी. विठाई पेट्रोल पंपाचे शेजारील मारुती ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान
७) यवत भागातील सहजपुर फाटया जवळील पुण्याकडील येणा-या रोडवर असणा-या मारुती सुझुकी शोरुममधील स्विप्ट कार क्रं. एम एच १२ के इ ४५५५ अश्या चो-या साथीदार नेमाराम उर्फ डौलाराम चौधरी, भुंडाराम उर्फ राजु चौधरी यांच्यासह केल्याचे सांगितले
. त्याच्याकडुन रोख रक्कम, ३,००,०००/- रुकि पिकअप गाडी, १,००,०००/-रुकि मारुती कंपनीची इको कार, ४,००,०००/- रु मारुती सुझुकी शोरुममधील स्विप्ट कार असा एकूण ८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले मोठया लोखंडी कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, पकड, लहान मोठे स्पॅनर, हॅसा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपी व त्याचे साथीदार नेमाराम उर्फ डौलाराम चौधरी, भुंडाराम उर्फ राजु चौधरी यांच्याविरुध्द यापुर्वी २१ घरफोडीचे व इतर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरुध्द एपीएमसी पोलिस नवी मुंबई गुरन. २१२/२०१९ प्रमाणे दाखल असणा-या गुन्हयात मोक्याची कारवाई करण्यात आली होती. सदर आरोपी हे जामीनावर बाहेर आले असताना त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. आरोपी यांच्याकडे तपास केला असता त्याने त्याचे साथीदार नेमाराम उर्फ डौलाराम चौधरी, भुंडाराम उर्फ राजु चौधरी
यांच्यासह खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे उघड झालेले आहेत.
१) कोंढवा पोलिस ठाणे कडील गुरन. १७२/२०२३, भा.दं.वि. कलम.४५४,३८०,५०६
२) कोंढवा पोलिस ठाणे कडील गुरन.५८०/२०२३, भा.दं.वि. कलम.३७९.
३) मंचर पोलिस ठाणे गुरन. २११/२०२३ भादवि कलम ४६१,३४.
४) लोणीकंद पोलिस ठाणे गुरन. ४८५ / २०२३ भादवि कलम ४५७,३८०.
५) लोणीकंद पोलिस ठाणे गुरन. ४८५ / २०२३ भादवि कलम ४५७,३८०.
६) भोसरी पोलिस ठाणे गुरन.५१८/२०२३ भादवि कलम ३७९.
७) यवत पोलिस ठाणे गुरन.६३१/ २०२३ भादवि कलम ४६१,३८०.

वरीलप्रमाणे चोरी केलेल्या ठिकाणावरुन आरोपी याने एकुण १० लाख रुपये किमतीचा किराणा माल चोरी केलेला आहे. संबंधित कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, सह पोलिस आयुक्त, रंजन शर्मा अपर पोलिस आयुक्त पुर्वे प्रादेशिक विभाग, विक्रम देशमुख, पोलिस उप आयुक्त परि.०५, शाहुराव साळवे सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आली आहे.
कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Top Ad