Police Suspend Order | पुणे पोलीस आयुक्तांनी उगारला कारवाईचा बडगा; सात जणांवर निलंबनाची कारवाई... - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Saturday, 1 July 2023

Police Suspend Order | पुणे पोलीस आयुक्तांनी उगारला कारवाईचा बडगा; सात जणांवर निलंबनाची कारवाई...

 पुणे पोलीस आयुक्तांनी उगारला कारवाईचा बडगा; सात जणांवर निलंबनाची कारवाई...


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुणे पोलीस आयुक्तांनी केली सात जणांवर निलंबनाची कारवाई पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सहकार नगर तोडफोड प्रकरणी निलंबनाची कारवाई केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलिस निरीक्षक मनोज शेंडगे आणि पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.


सदाशिव पेठेत युवतीवर झालेल्या हल्ल्यानंतर सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस चौकीच्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांनी पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणी निलंबनाची कारवाई केली आहे. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील सहकार नगर परिसरात दोन गटांत हाणामारी झाली होती. यावेळी परिसरातील गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली होती. याचाच ठपका ठेवत पोलिस आयुक्तांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. सहकार नगर परिसरातील घटना घडल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. परंतु, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती.

दरम्यान, पुणे पोलिस आयुक्तांकडून निलंबनाच्या कारवाईचा धडाका सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, गुन्हेगारीवर वचक बसण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad