Drugs Free Kondhwa | कोंढवा नशा मुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना; पुणे NGO's फेडरेशनची बैठक पार - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Monday, 26 June 2023

Drugs Free Kondhwa | कोंढवा नशा मुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना; पुणे NGO's फेडरेशनची बैठक पार

कोंढवा नशा मुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना; पुणे एन.जी.ओ  फेडरेशनची बैठक पार

पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुणे एन.जी.ओ  फेडरेशनची बैठक पार पडली या बैठकीत पुणे शहर नशा मुक्त कसे करता येईल यावर चर्चा करण्यात आली या अभियानात जवळ जवळ २० ते २५ संघटनांनी पुढाकार घेऊन वॉर्ड स्तरीय नशा मुक्ती साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आज अंमली पदार्थांचे व्यसन हे एक गंभीर समस्या असून तरुण पिढी बरबाद होत चालली आहे या व्यसनामुळे माणसाचे अमूल्य जीवन अकाली मृत्यूला बळी पडते. दारू, गांजा, भांग, अफू, जर्दा, गुटखा, तंबाखू आणि धुम्रपान (बिडी, सिगारेट, हुक्का, चिल्लम) यांसह चरस, कोकेन, ब्राऊन शुगर यांसारखी घातक अंमली पदार्थ आणि द्रव्ये नशेसाठी तरुण वर्गात जास्त वापरली जात आहेत. या विषारी आणि मादक पदार्थांच्या सेवनाने व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होते तसेच सामाजिक वातावरण दूषित होते. यासाठी संघटनेच्या वतीने मुख्य रस्ते व चौकात बॅनर लावून तसेच जनजागृती साठी हातात पोस्टर घेऊन रॅली काढण्यात येणार असून आप आपल्या परिसरात सुरु असलेले गांजा- दारू, मटका, जुगार यावर देखील पोलीस आयुक्ताची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले

आज लोक विडी, सिगारेट, गांजा, भांग, अफू किंवा चरस, हातभट्टी, दारू यांचे सेवन करतात, त्याच बरोबर गोरगरीब जनता मटका जुगारा कडे वळली असून त्यांचे घर उध्वस्त होण्याची वेळ या जनतेवर आली आहे पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असून यावर लवकरच शिष्टमंडळ पुणे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांची भेट घेणार आहे  जे लोक व्यसन करून व्यसनाधीन झाले आहेत त्यांना पुरेसा नशा चढत नाही, तेव्हा ते दारू, मेफड्रॉन सारख्या अमली पदार्थांकडे वळतात. नशा कोणत्याही प्रकारची असो, ती व्यक्तिमत्त्वाच्या विनाशाची, गरिबीत वाढ आणि मृत्यूची दारे उघडते. त्यामुळे कुटुंबेही तुटत आहेत. आजची तरुणाई फक्त दारू, गांजा, मेफड्रॉन या ड्रग्जच्या आहारी जात नाही तर काही ड्रग्जचा अमली पदार्थ म्हणून वापर करत आहे. ही राक्षसी प्रवृत्ती संपवणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व प्रथम कोंढवा परिसरातून या नशा मुक्ती साठी रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे
जे लोक नशा करत आहेत सगळ्यात वाईट अवस्था त्या मुलांची असते जे प्रौढ नसतात, पालकांच्या रोजच्या त्रासाचा किंवा वादाचा त्यांच्या विवेकबुद्धीवर वाईट परिणाम होतो, अशी मुले इतर मुलांच्या तुलनेत मानसिकदृष्ट्या मागासलेली असतात. घरात चांगले वातावरण न मिळाल्याने ते अधीन होतात आणि ते नेहमी घाबरतात. त्याच्या वर्गमित्रांशी मोकळेपणाने बोलता येत नाही. अपराधीपणाने ग्रासलेले ते शिक्षकासमोर थरथर कापत राहतात. अज्ञाताच्या भीतीमुळे शिकलेल्या गोष्टींची काळजी घेता येत नाही. अशा लोकांच्या वेदना आणि मानवी हक्कांशी संबंधित प्रश्नांकडे आपण, आपला समाज आणि सरकारे कधी लक्ष देतात का? असा सवाल व्यसनी तरुण पिढीच्या पालकांना होत आहे
ज्या ठिकाणी असे गांजा विक्री, हातभट्टी, मटका-जुगार, MD विक्री होताना दिसत असेल तर संघटनेशी संपर्क साधण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले व्हाट्सअँप क्रमांक - 7020873300 ( टीप : धंदयांचे फोटो व पत्ता पाठवावा आपले नाव गुपित ठेवले जाईल )
 

No comments:

Post a Comment

Post Top Ad