पुणे शहरात कोंढवा परिसरात कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवल्याने पोलिसांचा सत्कार
पुणे माझा न्युज नेटवर्क । वरिष्ठ प्रितिनिधी बसवराज कुंभार : समाजातील पीडित न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे येतो, त्याला न्याय देऊन गुन्हेगारावर वचक ठेवण्याचे काम पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत असतात. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे समाजामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राखली जात आहे. अधिकारी-कर्मचारी पोलीस खात्यामध्ये चांगली कामगिरी करीत आहेत. त्यांची प्रशासनाकडून दखल घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाते.
महाराष्ट्रात समाज कंटकांनी जातीय तेढ निर्माण करण्यासाठी लव्ह जिहाद, जातीवाद सारखा प्रपोगंडा करताना पोलीस यंत्रणे समोर आव्हान उभे राहिले होत एकीकडे मुस्लिम समाजाच्या रमजान ईद आणि बकरी ईद सारखे मोठे सण मोठ्या उत्साहात साजरा केले जातात हा सण साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी पोलीस यंत्रणेने केली होती पुणे शहरातील कोंढवा परिसर हा बहुमूल्य मुस्लिम समाज असून याच भागात रमजान, गावचा उरूस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी असा त्रिकोणी संगम त्याच बरोबर बकरी ईदच्या दिवशी आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने यातून कायदा सुव्यस्थेची जवाबदारी सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व तसेच पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी कोढंवा पोलीस ठाण्याचे नव्याने पदभार सांभाळणारे श्री संतोष सोनावणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकारी कर्मचारी यांनी कायदा सुव्यस्थेचे एक मोठे आव्हान असताना आपले कर्तव्य अति प्रामाणिकपणे पार पाडत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही मुस्लिम समाजाची बदनामी करून दंगली घडवण्याचा जो प्रयत्न काही समाजकंटक करत असताना कायदा सुव्यवस्थाची जान ठेवणारे महाराष्ट्र पोलीस यांना पुणे माझाचा सलाम
कोंढवा पोलीस ठाणे हे बहुमूल्य मुस्लिम वस्तीत येणारे हिंदू - मुस्लिम समाज एकात्मतेचे प्रतीक मानले जाते याच भागात शांतता राखण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडीची समस्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आपल्या कोढंवा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस व पोलीस अधिकारी सोबत वाहतुक विभागाची शांती सुखव्यवस्थेची सुध्दा जवाबदारी घेवून सोबत पुण्याची व कोंढवा भागात कौसर बाग, एन.आय. बी. एम. रोड, कोढंवा बुद्रुक, टीळेकर नगर, उंड्री, येवले वाडी एवढा प्रचंड विभाग कोंढवा पोलीस ठाणे अंतर्गत येत असताना ही जवाबदारी त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी काही समाजसेवक, पत्रकार, राजकारणी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे कोंढवा पोलीस ठाणे यांचा सत्कार केला यावेळी कोंढवा परिसरातील समाजसेवक छबिल पटेल, काँग्रेस पार्टीचे परिवहन विभागाचे पुणे शहर अध्यक्ष अय्याज खान, शाहिद शेख, सोनू सरोदे, वरिष्ठ पत्रकार बसवराज कुंभार, नागेश देडे पत्रकार, सादिक शेख ( मजहरी ) त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते राज फैय्याज कोरोना काळात सरकार विरोधी लढा देणारे कोरोना योद्धा व सामाजिक कार्यकर्ते, शोध पत्रकारीता करणारे मुख्य संपादक रियाज मुल्ला यांनी त्याचे कौतुक करत अभिनंदन केले
No comments:
Post a Comment