Khadak Police Station Drive | खडक पोलीस ठाणेची वाहनावर चालकावर धडक कारवाई - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 5 July 2023

Khadak Police Station Drive | खडक पोलीस ठाणेची वाहनावर चालकावर धडक कारवाई

 खडक पोलीस ठाणेची वाहनावर चालकावर धडक कारवाई



पुणे माझा न्युज । प्रतिनिधी :
खडक पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे अधिकरी व अंमलदार यांनी वाहन चालकाविरोधात कारवाईची मोहिम राबिवली होती. सदर कारवाई दरम्यान पोलीसांनी वाहन चालक यांचे विरोधात मोटार वाहन कायदया अंतर्गत कारवाई करुन एकुण रु ३९,५००/- चा दंड आकारण्यात आलेला आहे. पेट्रोलिंग दरम्यान कारवाई करताना विना परवाना वाहनधारक, इन्शुरन्स पुर्ण नसलेली वाहने, ट्रिपल सिट वाहने, वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलणारे, सिंग्नल जंम्पीग करणारी वाहन चालक, वाहन चालविणारी अल्पवयीन मुले, वाहन चालविताना आढळुन आल्याने त्यांच्या विरोधात वर नमुद प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असुन कारवाई दरम्यान वाहन चालविणारी अल्पवयीन मुलाच्या पालकांना बोलावुन त्यांनी वाहन चालविण्यास दिल्याने त्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलांच्या पालकांना पोलीसांनी बोलावुन त्यांना अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देवु नका तसेच सदर वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता असल्याने सदरबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तसेच वाहन चालक यांना हेल्मेटच्या वापराबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.


मोटर वाहन कायदयाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत याबाबत वाहतुकीच्या चिन्हांचा वापर करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आहे. तसेच इथुन पुढे वाहन कायदयाचे नियमाचा भंग केल्यास त्यांचेविरोधात कठोर कारवाई केली जाणार असलेबाबत नागरिकांना सुचित करण्यात आले आहे.

सदर कारवाई मा. संदिपसिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०१ यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना विभागाचे सहा. पोलीस आयुक्त श्री. अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली, खडक पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल माने, पोलीस निरीक्षक श्री. संपतराव राउत, पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर व खडक पोलीस ठाणे अधिकारी व वाहतुक विभागाचे अंमलदार हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad