कोंढव्यातील पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष यांनी गैरव्यवहाराबद्दल गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांचेवर विनय भंगाचा खोटा गुन्हा दाखल;
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : कोंढव्यातील पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची तक्रार ट्रस्टचे अध्यक्ष जुबेर रशिद खान यांनी केल्याचा राग मनात धरून जुबेर खान यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हकीकत अशी की, शाळेच्या मालमत्तेवरुन जुबेर रशिद खान व त्यांच्या बहिणींचा वाद सुरू होता त्यांच्या बहिणींनी शाळेत व ट्रस्टच्या नावावर लाखो रुपयांचा अपहार केल्यामुळे जुबेर रशीद खान यांनी यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाणे या ठिकाणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता तसेच त्यांना शाळेत येण्यास मज्जाव करण्यात आला होता याचाच गैर फायदा घेऊन आरोपी नामे तबस्सुम अन्वर शेख (वय ४८), अन्वर नजीमुल्ला शेख (वय ५५, दोघे रा.कॅम्प), तरन्नुम कादर सय्यद (वय ४३), कादर छोटेमिया सय्यद (वय ५२, रा. लोणावळा), नाजेमा साहेल खान (वय४२), सोहेल इस्माईल खान (वय ४८, रा. अम्मार सोसायटी, कोंढवा) आरीक शेख (वय ३७), आरीफ शेख (वय ४०) यांनी शक्कल लढवत शाळेतील काही शिक्षक, शिक्षिका यांना हाताशी घेऊन शाळेत प्रवेश प्रकियेसाठी ( Admission Process ) शाळे शेजारील असणाऱ्या बिल्डिंग अम्मार रेसिडेन्सी मध्ये नवीन ऑफिस चालू करून त्या ठिकाणी ऍडमिशनच्या नावावर पालकांची लूट करण्याचे कारस्थान चालू केले होते
याबाबत जुबेर रशीद खान यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली याचाच राग मनात धरून एका शिक्षिकेला हाताशी घेऊन जुबेर रशीद खान त्यांचेवर विनय भंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात त्यांना यश मिळाले अधिक माहिती अशी कि,
याबाबत एका ३६ वर्षाच्या ( नाव सुनीता बबन साळेकर ) महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गु . रजि . नं . ७१०/२३ गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी जुबेर रशिद खान वय ४५ , रा . पदमजी पार्क , नाना पेठ,अजहर खान,वय ३८ आणि अफाक अन्सार खान, वय ४० यांच्यावर गुन्हा दखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील मिठानगर येथील प्राथमिक शाळेत ५ जुलै २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजता घडल्याचे सांगितले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी ( नाव सुनीता बबन साळेकर ) या कोंढव्यातील मिठानगर येथील एका प्राथमिक शाळेत टिचर म्हणून काम करतात.
जुबेर रशिद खान यांनी काही दिवसांपूर्वीच ट्रस्टची लाखो रूपयांची फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता - 👈 बातमी पाहण्यासाठी क्लिक करा
शाळेच्या प्रिन्सिपल आणि त्यांचा भाऊ जुबेर यांच्यात शाळेच्या मालमत्तेवरुन वाद चालू आहेत.फिर्यादी ( नाव सुनीता बबन साळेकर ) या नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत जात असताना गेटवरच जुबेर खान यांनी फिर्यादी यांचा हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन केले आणि शाळेत न जाण्याची धमकी दिली. ( एक मोठ्या ट्रस्टचा अध्यक्ष एक प्रतिष्ठित व्यक्ती हाताखाली अनेक कर्मचारी असताना त्यांनी असे कृत्य करणे कितपत खरे आहे आपण विचार करू शकता ) तसेच इतरांनी फिर्यादीस शाळेत जायचे नाही तर आम्ही तुला मारणार अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तोरगल तपास करीत आहेत.
ट्रस्टचे अध्यक्ष जुबेर रशीद खान यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क केला असता मिळालेल्या माहिती नुसार हा गुन्हा खोटा असल्याचे सत्य लोकांसमोर आणू तसेच लवकरच याबात कोर्टात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे
No comments:
Post a Comment