घर का भेदी लंका ढाये अशीच गत झाली असून वडिलोपार्जित प्रॉपर्टी व ट्रस्ट, शाळे मध्ये पन्नास लाखोंची हेराफेरी करणाऱ्या बहिणींविरुद्ध व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे माझा न्युज नेटवर्क । प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून येणारी शालेय व इतर फी ( रक्कम ) संस्थेच्या खात्यात जमा न करता ५० लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री जुबेर रशिद खान यांनी चौकशी अंती माहिती न मिळाल्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५२८/२३) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी तबस्सुम अन्वर शेख (वय ४८), अन्वर नजीमुल्ला शेख (वय ५५, दोघे रा.कॅम्प), तरन्नुम कादर सय्यद (वय ४३), कादर छोटेमिया सय्यद (वय ५२, रा. लोणावळा), नाजेमा साहेल खान (वय४२), सोहेल इस्माईल खान (वय ४८, रा. अम्मार सोसायटी, कोंढवा) आरीक शेख (वय ३७), आरीफ शेख (वय ४०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ट्रस्ट व त्या अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे कागदपत्रावर आरोपींनी खोट्या सह्या केल्या. विद्यार्थ्यांकडून येणारी फी संस्थेच्या खात्यावर जमा न करता ५० लाखांहून अधिक रक्कमेचा अपहार करुन शासनाची व संस्थेची फसवणूक केली.
आरोपी एवढे चालक आणि हुशार निघाले कि आरोपींनी संस्थेचे अध्यक्ष श्री जुबेर रशीद खान व त्यांची आई यांच्या नावाने बनावट व खोटी सही करुन संस्थेचे लेटरहेड वापरुन जव्वाद शेख या शिक्षकाची अनुदानित पदावर नेमणूक केली एवढेच नाहीतर शाळेतील कर्मचारी नाजेमा साहेल खान या सतत आजारी असून गैरहजर असताना ही शाळेच्या मस्टरवर ( हजेरी पुस्तक ) वर एकत्रित सही करुन संस्थेची व शासनाची फसवणूक केली आहे याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री जुबेर रशीद खान यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment