कुख्यात घरफोडी करणारी टोळी गजाआड: विश्रांतवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कारवाई
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी पुणे - विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुरनं १७९ / २०२३ भादविक ४५४, ३८०, ४१३,३४ या दाखल गुन्हयात अज्ञात आरोपी यांचा शोध घेणेकामी पोलीस उप निरीक्षक सातपुते व तपास पथकातील अंमलदार असे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करत असताना दि. १४/०७/२०२३ रोजी सायंकाळी १७.१५ वा चे सुमारास भरत ढाब्याजवळ आले असता पोलीस अंमलदार संपत भोसले व प्रफुल मोरे यांना त्यांचे बातमीदाराकडून माहिती मिळाली की मुंजाबावस्ती येथे संशयीत रित्या तीन इसम संशयीत रित्या फिरताना दिसत आहेत अशी बातमी मिळाल्याने पोउनि सातपुते यांनी लागलीच दोन टिम तयार करून तीन विमान बिल्डींग गोकुळनगर येथे तीन इसम समोरुन येताना दिसले त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून जात असताना त्यांना पोउनि सातपुते व तपास पथकातील अंमलदार दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, संपत भोसले, संजय बादरे, संदिप देवकाते प्रफुल मोरे आणि शेखर खराडे यांनी तब्यात घेतले त्यांना पळून जाण्याचे कारण विचारले असता ते उडवा उडवीची उत्तरे देवू लागले त्यांचा घर फोडया चोऱ्या करण्याचा संशय आल्याने त्यांना त्यांची नावे पत्ते विचारले
असता त्यांनी त्यांची नावे १) पंचाक्षरी संगय्या स्वामी वय ३५ वर्षे, रा. प्लॅट नं ७, हिलपार्क अपार्टमेंन्ट, मोदी सोलापूर २) नरेश विष्णू अच्चुगटला वय ३३ वर्षे रा. जुनी मिलचाळ मुरारजी पेठ, सोलापूर ३) अंगद वाल्मीक बंडगर वय ३० वर्षे रा. गंगानगर, जुना देवगाव नाका जगताप हॉस्पीटल जवळ, सोलापूर असे असल्याचे सांगीतले. त्यांची अंगझडती घेतली असता इसम नामे पंचाक्षरी संगय्या स्वामी याचे कमरेस शर्टाच्या आतमध्ये एक लोखंडी कटावणी मिळून आली तसेच त्याचे पॅन्टचे खिशामध्ये एक सोन्याचे गंठण, एक सोन्याची अंगठी, दोन जोड कानातीन रिंग असे दागीने मिळून आले तसेच सोन्याचे दागीने बाबत त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी आम्ही हडपसर येथे चोरी केल्याचे सांगीतले त्यानंतर त्यांना दाखल गुन्हयात अटक करून तपासात आणखीन दोन आरोपी ४) शावर सिध्द भरत पुजारी वय ३५ वर्षे रा कुमठा नाका सोलापूर ५) कल्याणप्पा मलप्पा इंडी वय ४९ वर्षे, रा. ८७६ पश्चिम मंगवार पेठ, सोलापूर करून करण्यात आली असून दाखल गुन्हयातील सोनार आरोपी कल्याणप्पा मलप्पा इंडी रा. मंगळवार पेठ सोलापूर याचे ताब्यातून चोरीचे सोन्याचे दागीने एकुण २२.५ तोळे किंमत रुपये १२,५०,०००/- रुपयाचे मुददेमाल हस्तगत करण्यात आले असून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन कडील एकुण ७ गुन्हे व हडपसर पोलीस स्टेशनकडील १ असे एकुण ८ घर फोडीचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे
सदरची कारवाई मा. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. शशीकांत बोराटे पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, मा. आरती बनसोडे, सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे मा. श्री दत्तात्रय भापकर, वपोनि विश्रांतवाडी तसेच भालचंद्र ढवळे पोनि गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री लहू सातपुते पो.हवा. दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, पोलीस नाईक संपत भोसले, संजय बादरे, पोलीस अंमलदार प्रफुल मोरे, संदिप देवकाते, शेखर खराडे, तांत्रीक विश्लेशक पोहवा आस्लम अत्तार झोन ४ ऑफीस यांचे पथकाने केली
No comments:
Post a Comment