पैसे वसुलीसाठी महिलेचा बलात्कार ; पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले : लिंगपिसाट ताब्यात
- आरोपीकडून महिलेच्या पतीने ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते
- कर्ज परतफेड देत नाही म्हणून पती, मुलांना जीवे मारण्याची धमकी देत केला बलात्कार
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी - पुण्यात दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाहायला मिळत आहेत अशीच एक घटना पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे ती म्हणजे पतीने ४० हजार रुपये परतफेड न केल्याने महिलेला घरी बोलावून पती , मुलांना जीवे मारण्याची धमकी देत बलात्काराचा संतापजनक प्रकार हडपसर म्हाडा कॉलनी येथे घडला आहे. सुसंस्कृत पुण्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिला यांचे पतीने आरोपीकडून 40,000/- रुपये उसने घेतले आणि ते परत केले नाही या रागातून यातील आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पतीस राहते घरी बोलवून घेतले. फिर्यादी यांच्या पतीस आणि मुलांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून फिर्यादी सोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध केले तसेच सदर संबंध चे सीसीटीव्ही मध्ये चित्रण झाले असता ते मोबाईल फोन मध्ये जतन केले आणि फिर्यादी यांनी पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नमूद अश्लील व्हिडिओ आरोपीने सोशल मीडिया वर प्रसारित केले.
याबाबत आरोपी इम्तियाज हासिम शेख, वय 47 वर्षे, धंदा व्यवसाय, राहणार बिल्डिंग ए/20 तळमजला, फ्लॅट नंबर 3, सुरक्षा नगर, म्हाडा कॉलनी, हडपसर पुणे. विरुद्ध हडपसर पोलीस ठाणे येथे गुरनं. 1086/2023 भादवी कलम 376, 376(2)(n), 506(2) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (इ)67(अ)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहा.पोलीस आयुक्य सो अश्विनी राख हडपसर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर, सहा.पोलीस निरीक्षक सारिका जगताप, सहा.पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोउनि कविराज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
रात्री उशिरा गुन्ह्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-६ कडून अवघ्या दोन तासात आरोपीला अटक करून हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
No comments:
Post a Comment