Vehicle and Mobile Theft Case | वाहनचोरी व मोबाईल चोरी करणारा गुन्हेगार येरवडा पोलिसांच्या जाळ्यात; उत्कृष्ठ कामगिरी - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Monday, 12 June 2023

Vehicle and Mobile Theft Case | वाहनचोरी व मोबाईल चोरी करणारा गुन्हेगार येरवडा पोलिसांच्या जाळ्यात; उत्कृष्ठ कामगिरी

 वाहनचोरी व मोबाईल चोरी करणारा गुन्हेगार येरवडा पोलिसांच्या जाळ्यात; उत्कृष्ठ कामगिरी



पुणे माझा न्युज । प्रतिनिधी :
येरवडा परिसरात वडगाव शेरी येथे मोटारसायकल चोरी करणारे दोन इसम थांबलेले आहेत अशी माहिती तपास पथकाचे अंमलदार अश्विन देठे व प्रशांत कांबळे यांना मिळाल्याने सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळवली असता त्यांनी मिळालेल्या माहिती वरून कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे व अंमलदार यांनी तेथे जाऊन संशयीत आरोपी पळून जात असताना मोठ्या शिताफीने पकडले. त्यास नाव पत्ता विचारले असता मकसूद एनुल्ला खान २९ राहणार मुंढवा, पुणे व एक विधी संघर्ष बालक असे असल्याचे सांगितले. सदर इसमाचे ताब्यात एक होंडा ऍक्टिवा मोटारसायकल मिळून आल्याने त्याबाबत अधिक चौकशी करता सदर गाडी त्यांनी वडगाव शेरी येथून चोरी केल्याचे कबुल केले आहे. येरवडा पोलीस स्टेशनला सदर बाबत पडताळणी केली असता येरवडा पो स्टे गुर न ३८८/२०२३ भादवि कलम ३७९ गुन्हा दाखल असल्याने सदर गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने मकसूद खान यास दि. ०९/०६/२०२३ रोजी अटक केली आहे. सदर आरोपीकडे अधिक तपास करता त्यांनी चंदननगर भागात एक मोटारसायकल व एक मोबाईल चोरी केल्याचे कबूल करून सदर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर बाबत चंदन नगर पो.स्टे. येथे पडताळणी केली असता दोन गुन्हे दाखल असल्याने आरोपीचा सहभाग निष्पन्न झालेने सदरचे गुन्हे उघडकीस आले आहेत 


१) येरवडा पो.स्टे.नं. ३८८/२०२३ भादंवि ३७९ -  २) चंदननगर पो.स्टे. गु.र.न. १८३/२०२३ भादंवि ३७९ - ३) चंदननगर पोस्टे गुप.न. २२०/२०२३ भादंवि ३७९

असे एकूण तीन गुन्ह्यातील मिळून मिळून तीन मोटारसायकल व मोबाईल असा एकूण एक लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकूण तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत माल जप्त करून

सदरची कामगिरी श्री शशिकांत बोराटे पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४, श्री. किशोर जाधव सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. बाळकृष्ण कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयदीप गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, श्रेणी  पोउपनि प्रदीप सुर्वे, पोहवा गणपत ठिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना अमजद शेख, कैलास डुकरे, किरण घुटे, सागर जगदाळे, प्रवीण खाटमोडे पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे प्रशांत कांबळे, अश्विन देठे, सुशांत भोसले, गणेश खरात सुजित सातपुते  यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad